
Mumbai Metro : मुंबईकरांना पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीतून आता लवकरच सुटका मिळणार आहे,कारण पश्चिम उपनगरातील दोन मार्गांवरील मेट्रो सेवा ही जलद सुरू होणार आहेत.त्यामुळे मुंबईकरांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.त्यासोबतच या दोन नवीन मेट्रो सेवांमुळे मुंबईकरांचा प्रवास आता आरामात व जलद होईल.(2 metro routes in Mumbai to start in December; Get out of the traffic jam soon)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) डहाणूकरवाडी व आरे मेट्रो स्थानकादरम्यान चाचणी घेण्यात आली आहे.त्यामुळे मेट्रो प्रवासाचा दुसरा टप्पा अखेर लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर आहे.ही मेट्रो चाचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थित पार पडली असून हा मार्ग डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या मेट्रोच्या फेऱ्यांची चाचणी सुरू असून मुंबई मेट्रोच्या रेड लाइन 7 म्हणजेच अंधेरी-पूर्व ते दहिसर व येलो लाइन 2 अ म्हणजे डी.एन.नगर ते दहिसर या दोन मार्गिकांवर मेट्रो सेवा ही डिसेंबर महिन्याच्या आधीच प्रवाशांच्या सेवेसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. तसेच या मेट्रो सेवांमुळे मुंबईकरांचा प्रवास हा अधिक जलद गतीने होणार आहे.
मुंबईत मेट्रो 7 (रेड लाईन) व मेट्रो 2 अ (येलो लाईन) या मेट्रो मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्थानक या मार्गांवर मेट्रोच्या चाचण्या विविध पातळीवर अंतिम टप्प्यात असून 20 किलोमीटरच्या मार्गावर या चाचण्या होत आहेत,तसेच मेट्रो स्थानकांची कामेही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे,तर दुसरा टप्पा जानेवारी 2022 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :