आपलं शहरखूप काही

Mumbai Monsoon : मुंबईत ऑरेंज अलर्ट, 3000 मिमी पावसाची नोंद होण्याची शक्यता

या मॉन्सून हंगामात मुंबईमध्ये 3,000 मिमी पावसाचा टप्पा ओलांडल्याची नोंद झाली आहे.

Mumbai Monsoon :भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे,व ठाण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.हवामान खात्याचे म्हणणे आहे की, मंगळवारी तसेच पुढचे काही दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.(Orange alert in Mumbai, 3000 mm rain likely)

सप्टेंबर महिन्यात अनेक राज्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. देशातील अनेक भागात अजूनही मान्सूनचा हंगाम सुरू आहे. तसेच काही राज्यांमध्ये मान्सून कालावधी संपूनही अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही भागात अजिबात पाऊस पडला नाही. भारतातील अनेक शहरांमध्ये जसे की मुंबईत अजूनही मुसळधार पाऊस होत आहे. या वर्षी काही भागात पाऊस जास्त झाल्याने काही राज्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

यापूर्वी भारतीय हवामान विभागाने (IMD) पालघर, रायगड व ठाणे यासारख्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला होता.IMD ने अंदाज वर्तवला आहे की 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. या मॉन्सून हंगामात मुंबईमध्ये 3,000 मिमी पावसाचा टप्पा ओलांडल्याची नोंद झाली आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत मंगळवारी व पुढचे काही दिवस गुलाब चक्रीवडळाचा प्रभाव दिसेल.त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता आहे. IMD ने म्हटले आहे की पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या वायव्येकडील गुलाब चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. डॉपलर वेदर रडारद्वारे तज्ञ विशाखापट्टणममधील गुलाब चक्रीवादळाचे निरीक्षण करत आहेत.

IMD शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दावा केला आहे की, गुलाब चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी तयार झाले असून ते वादळ पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 28 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र कोकणच्या काही भागात मुसळधार पाऊस होईल. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याची विनंती केली जात आहे.

 

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments