फेमस

Mumbai Museum : मुंबईतील दाजी भाऊ लाड संग्रहालय; पहा काय आहे इतिहास…

या वास्तूची निर्मिती 2 मे 1872 मध्ये करण्यात आली होती. यापूर्वी या संग्रहालयाचे नाव व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असे होते.

Mumbai Museum : मुंबईला अनेक ऐतिहासिक वारसे लाभल्याचे आपल्याला दिसते.मुंबई नागरी ही एखाद्या स्वप्नातल्या दुनियेसारखी आहे.या मुंबई नगरीत अनेक संग्रहालय आहेत,त्यातलंच एक संग्रहालय हा अगदी जुना व त्याचा इतिहास ही तितकाच रोचक आहे.हे संग्रहालय म्हणजे राणीच्या बागेतले भाऊ दाजी लाड संग्रहालय.या संग्रहालयातील कालाशैली पाहण्यासाठी तुम्ही या वास्तूला एकदा तरी नक्की भेट द्या.(Daji Bhau Lad Museum in Mumbai; See what history is …)

IMG 20210925 WA0010

या वास्तूची निर्मिती 2 मे 1872 मध्ये करण्यात आली होती. यापूर्वी या संग्रहालयाचे नाव व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असे होते. मात्र नंतर या वास्तूचे नामकरण मुंबईचे पहिले भारतीय शेरीफ व या संग्रहालयाच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजावणारे डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या नावावरून ठेवण्यात आले.

मुंबईतील हे अतिशय प्राचीन वस्तू संग्रहायल आहे. हे संग्रहालय 154 वर्ष जुने आहे, हे संग्रहालय सुरू झाले, तेव्हा हे संग्रहालय मुंबईतील पहिले व देशातले तिसरे संग्रहालय ठरले.काही उत्साही मंडळींनी पुढाकार घेत स्थानिक कलाकारांच्या कलागुणांचे प्रदर्शन व प्रोत्साहन यासाठी अशा संग्रहालयाच्या कल्पेनेवर काम सुरू केले होते.

परंतु लोकाश्रय, देखरेख आणि निधीअभावी या संग्रहालयाची दुरवस्था झाली होती. काही कलाप्रेमींनी व मुंबईकरांनी हा वारसा जपण्यासाठी या संग्रहालयाची 2000 मध्ये पुन्हा दुरुस्ती करण्यात आली.तसेच याच्या दुरुस्ती साठी त्यांना बजाज फाउंडेशनचीही साथ मिळाली व या संग्रहालयाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यात मदत झाली.

IMG 20210925 WA0009

त्यामुळे भाऊ दाजी लाड या संग्रहालयाला सांस्कृतिक वारसा जपण्याबद्दल दिला जाणारा युनेस्कोचा सर्वोत्कृष्ठ पुरस्कारही 2005 मध्ये मिळाला आहे.सध्या महापालिका व खासगी संस्थेमार्फत या संग्रहालयाची देखभाल केली जात आहे.

भाऊ दाजी लाड संग्रहालय हे 91 ए, राणी बाग, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, भायखळा पूर्व मुंबई येथे आहे.या संग्रहालयात प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुक्ल आकारले जाते.हे संग्रहालय पर्यटकांसाठी गुरूवार ते मंगळवार पर्यंत खुले असते.व सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत येथे प्रेवेश दिला जातो.परंतु तुम्ही फक्त एक तास या संग्रहालयात फिरू शकता.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments