Mumbai news : मुंबईच्या केईएम रुग्णालयात नोकरीची संधी,पहा कोणत्या पदावर आहे भरती…
येत्या 24 सप्टेंबर 2021 पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत केईएम रुग्णालयातील आवक-जावक विभागात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Mumbai news :तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तर मुंबईतील केईएम रुग्णालयात म्हणजेच मुंबई महापालिकेच्या शेठ गो. सु. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच राजे एडवर्ड स्मारक(केईएम) रुग्णालयातील लिपिकांची (नव्याने पदनाम झालेल्या कार्यकारी सहायक यांची) रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. ही भरती 40 पदांसाठी होणार आहे.परंतु ही 40 पदे कायमस्वरुपी न भरता कंत्राटी पध्दतीने भरली जात आहेत.यासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.Job opportunities in KEM Hospital, Mumbai, see which post is recruitment …
येत्या 24 सप्टेंबर 2021 पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत केईएम रुग्णालयातील आवक-जावक विभागात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.केईएम रुग्णालयातील कार्यकारी सहायक अर्थात पूर्वीच्या लिपिक पदांसाठी रिक्तपदे कंत्राटी पध्दतीने 90 दिवसांच्या करारनामा सापेक्ष भरण्यासाठी स्थानिक जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत.
या कंत्राटी कार्यकारी सहायक पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा व किमान प्रथमच प्रयत्नात उमेदवार हा 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. उमेदवारकडे माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र वा तत्संग किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
निवडीचे निकष
उमेदवारांच्या प्राप्त केलेल्या गुणांनुसार तथा टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीत नाव असलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी ही मुलाखत व व्यवसाय चाचणीनुसार तयार करण्यात येणार आहे.
वयोमर्यादा व वेतन
खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षांपेक्षा जास्त वय असता कामा नये.मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही 18 ते 43 आहे. कार्यकारी सहायक (कंत्राटी) यांना दरमहा 18 हजार रुपये एकत्रित निश्चित वेतन देण्यात येणार आहे.
उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण व दिनांक
उमेदवारांचे अर्ज भरण्याची तारीख 13 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे,तर 24 ऑक्टोबर 2021 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.हे अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 11ते सायंकाळी 4 पर्यंतची आहे. तसेच अर्ज भरण्याचे ठिकाण हे आवक-जावक विभाग, केईएम रुग्णालय,मुंबई इथे आहे.
हे ही वाचा :