फेमस

Mumbai Park : मुंबईतलं असं ठिकाण, जिथे 12 महिने घेऊ शकता निसर्गाचा आनंद…

104 चौ. कि. मी. परिसरात पसरलेले हे जंगल गेल्या 40 वर्षांपासून हौशी पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण बनले आहे.

Mumbai Park : तुम्ही मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देणार आहात का, तसेच तुमची जंगल सफारीची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी खास मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेले ठिकाण म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. यालाच नेशनल पार्क असेही म्हणतात.A place in Mumbai where you can enjoy nature for 12 months …

104 चौ. कि. मी. परिसरात पसरलेले हे जंगल गेल्या 40 वर्षांपासून हौशी पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण बनले आहे.या उद्यानात निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, किटक, पक्षी यांच्या प्रजाती तुम्हाला इथे बघायला मिळतील. तसेच पावसाळ्यात खास निसर्गप्रेमींसाठी अनेक शिबिरांचे आयोजन येथे केले जाते. येथे एक नदी देखील आहे. जिथे कृत्रिम तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकता, तसेच हे उद्यान वर्षाचे बाराही महिने पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. याबरोबर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी सुरु करण्यात आलेली वनराणीही मीनी ट्रेन लहानांबरोबरच मोठ्यांच्याही आवडीची झाली आहे.

येथे वाघ, सिंह, चित्ता, सांबर, माकड, सर्प यांसारखे वन्य प्राणी अजूनही आढळतात. सरकार तर्फ़े येथे व्याघ्र प्रकल्प राबवला जात आहे, तर या वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलसफारीची देखील सोय उपलब्ध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या स्मरणार्थ येथे गांधी टोपीची प्रतीकृतीही उभारण्यात आली आहे. दरवर्षी जवळपास 20 लाख पर्यटक या राष्ट्रीय उद्यानाला भेट देतात. या जंगलात वन्य प्राण्यांचा संचार असल्याने काही भागात पर्यटकांना जाण्यास बंदी आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईतीलच नव्हे, तर आशियातील सर्वात जास्त भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. या उद्यानात तुम्ही 2000 वर्ष जुने कान्हेरी लेण्यांना भेट देऊन बुद्धांचे अवशेष पाहू शकता. अबाधित नैसर्गिक पायवाटे आणि जंगलातील जैन मंदिरे देखील इथे पाहायला मिळतील, या उद्यानाला तुम्ही भेट देणार असाल, तर तुमची भेट ही अविस्मरणीय ठरेल याची खात्री आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments