Uncategorizedआपलं शहरखूप काही

Mumbai Railway Pod Hotel : एक दिवसाचा स्टे? मग कमी पैशांत करा पॉड हॉटेल बूक, सगळ्या सुविधा फाईव्ह स्टार…

रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकाबाहेर पॉड (लहान खोल्या)हॉटेल उभारण्याची योजना आखली आहे.या पॉड हॉटेलच्या खोल्यांची किंमत ही सर्वसामान्यांच्या खिशालाही परवडणारी असणार आहे.

Mumbai Railway Pod Hotel : आपण मुंबईत रेल्वेने अनेक वेळा प्रवास केला आहे.बहुतेक प्रवासी दुरून प्रवास करून येतात त्यांना रेल्वे स्थानकाबाहेर राहण्याची सोय ही नसते.त्यामुळे त्या प्रवाशांना पूर्णरात्र रेल्वे स्थानकावरच काढावी लागते.एकट्याने प्रवास करताना समान्य माणसांना खाजगी हॉटेलमध्ये राहणेही परवडत नाही,यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकाबाहेर पॉड (लहान खोल्या)हॉटेल उभारण्याची योजना आखली आहे.या पॉड हॉटेलच्या खोल्यांची किंमत ही सर्वसामान्यांच्या खिशालाही परवडणारी असणार आहे.(A day’s stay? Then book a pod hotel for less money, all the facilities are five star…)

प्रवाशांसाठी सुख-सोयींनी सुसज्ज अशी छोट्या आकारातील पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझमने (IRCTC) घेतला आहे.
या पॉड हॉटेलमध्ये तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था प्रवासांसाठी उपलब्ध करण्यात येईल.IRCTC कडून या संदर्भात पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला पश्चिम रेल्व प्रशासनाकडून मंजुरी देखील मिळाल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

20210926 113901 1

या आधुनिक डिझाइनच्या पॉड हॉटेलची उभारणी ही अगदी कमी खर्चात व कमी जागेत केली जाणार आहे.प्रवाशांना या हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सोय केली जाणार आहे.सर्वप्रथम जपान या देशात पॉड हॉटेलची संकल्पना बनवण्यात आली होती.जपानने तेथील प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी जागा मिळावी, यासाठी पॉड हॉटेलची निर्मिती केली होती.

20210926 113954

या पॉड हॉटेलमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आरामदायक बेड,लहान खाजगी सॅटेलाइट टीव्ही,मोबाईल चार्जिंग सुविधा,वातानुकूलित सुविधा, भिंतीचा आरसा,स्मोक डिटेक्टर आणि अग्निप्रतिरोधक यंत्रणा व हॉटेलमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात येतील. त्याचबरोबर हॉटेल परिसरात स्वच्छतागृह, कॉफीशॉप अशा अन्य सुविधादेखील पुरवण्यात येणार आहेत, असे IRCTC च्या अधिकाऱ्याने सांगितले.

20210926 114116

मुंबई लोकलच्या पश्चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल येथे या पॉड हॉटेलचे काम सुरू असून ऑक्टोबर मध्ये याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे.या हॉटेलमध्ये एकूण 48 खोल्या बांधण्यात येणार आहेत,त्यात फर्स्ट फ्लोअर वर पी आकाराच्या 26 खोल्या असतील तर सेकेंड फ्लोअर वर टी आकाराच्या 21 खोल्या बांधण्याचे नियोजन आहे.

भारतीय रेल्वेतील हे पहिले पॉड हॉटेल आहे. हे हॉटेल ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून नोव्हेंबरमध्ये हॉटेल प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहेत. रेल्वे स्थानकावरील हे पहिले ‘पॉड’ हॉटेल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणार आहे.असे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments