आपलं शहरबीएमसी

Mumbai Red Alert : मुंबईमध्ये 5 ऑक्टोबरपर्यंत सावधानी, बाप्पा जाताच संकट येण्याची शक्यता…

Mumbai Red Alert : सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर गणपती विसर्जन चालू आहे आणि त्यातच नागरिकांची होणारी गर्दीही पाहिला मिळत आहे.

Mumbai Red Alert : सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर गणपती विसर्जन चालू आहे आणि त्यातच नागरिकांची होणारी गर्दीही पाहिला मिळत आहे. आशाताच आता महापालिकेने नागरिकांना सावध केले आहे. कोविड -19 च्या प्रकरणांची संख्या आता स्थिर राहिली असली तरी, तज्ञांनी सांगितले की, पुढील १५ दिवस शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील.

“गणपती उत्सवासाठी शहर सोडून गेलेले लोक घरी परतत असल्याने कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे,” असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले. व परतत आसलेल्या नागरिकांपैकी जरी कोणाला लक्षणे दिसून आली नाहीत, तरी देखील त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी असे सांगण्यात आले आहे

गणपती उत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे आणि नागरिकांच्या परस्परसंवादाचा परिणाम समजून घेण्यासाठी आम्हाला किमान 5 ऑक्टोबरपर्यंत सतर्क राहावे लागेल, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकांना आवाहन केले की, साध्या गणपती विसर्जन चालू आहे त्यातच नागरिकांचा एकमेकांशी संपर्क येत आहे तरी आपण आपली योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे कारण मुंबई, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या काही भागात सकारात्मक प्रकरणांची संख्या अधिक आहे.

राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी म्हणाले की, जेथे डेल्टा-प्लसचे रुग्ण सापडली आहेत तेथून लोक परत येतील अशातच आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याची गरज आहे..रुग्ण संख्य वाढू नयेत यासाठी आम्ही आमची रणनीती सुधारत आहोत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments