खूप काही

Mumbai to Delhi : मुंबई ते दिल्ली; फक्त 12 तासांचा प्रवास, पाहा कसा होतोय देशातील सर्वात मोठा महामार्ग

या एक्स्प्रेसवेची लांबी ही 1 हजार 380 किमी असणार आहे. हा मार्ग जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत (JNPT) बांधण्यात येणार होता.

Mumbai to Delhi : मुंबईसह भारतात अनेक ठिकाणी लांबचा प्रवास करण्यासाठी खूप प्रमाणात वेळ लागतो. त्यात वाहतूक कोंडीचाही त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे सरकार जगातील सर्वात लांब महामार्ग म्हणजेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे बांधत आहे, त्यामुळे देशातील 2 महत्त्वाची शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत.(12 hour journey, how the largest highway in the country is being built)

या एक्स्प्रेसवेची लांबी ही 1 हजार 380 किमी असणार आहे. हा मार्ग जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत (JNPT) बांधण्यात येणार होता. परंतु, आता हा एक्सप्रेस हायवे मुंबईच्या नरिमन पॉईंटपर्यंत बांधण्यात येणार असल्याचे नियोजन केले आहे. या महामार्गामुळे मुंबईकरांच्या वेळेची बचत होणार असून,वाहतूक कोंडीचाही त्रास कमी होणार आहे. तसेच मुंबई ते दिल्ली प्रवास हा कमीतकमी वेळेत होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

आतापर्यंत मुंबई ते दिल्ली दरम्यानचे अंतर ट्रकने पार करण्यासाठी सुमारे 48 तास तर हेच अंतर कारने पार करण्यासाठी 24 ते 26 तास लागतात. मात्र येत्या वर्षभरात दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे पूर्ण झाल्यानंतर प्रवासासाठी लागणारा वेळ खूप मोठ्याप्रमाणात कमी होणार आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर दिल्ली आणि मुंबईमधील अंतर कापण्यासाठी एखाद्या ट्रकला अंदाजे 18 ते 20 तर कारला 12 ते 13 तास लागणार असल्याची माहितीही गडकरींनी दिली आहे.

हा महामार्ग महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली अशा पाच राज्यांना जोडणार आहे. ज्यामुळे या भागात विकासाची कामे होऊ शकतात. लोकांसाठी रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. हा एक्सप्रेस वे दिल्लीच्या फरीदाबाद-सोहना सेक्शन, जेवर विमानतळाच्या टोकापासून ते मुंबईतील नरिमन पॉईंटपर्यंत किंवा जवाहरलाल नेहरू बंदराशी हा हायवे जोडला जाणार आहे.

सध्या दिल्ली ते मुंबई अशा प्रवासासाठी 1450 किमी अंतर कापावे लागते, पण एक्सप्रेस-वेचे काम पूर्ण झाल्यानंतर हे अंतर 1250 किमी होणार आहे. त्यामुळे सध्या 24 तासांचा वेळ लागणारा हा प्रवास एक्सप्रेसवेमुळे 12 तासांवर येईल असे सांगितले जात आहे. तर या महामार्गामुळे केंद्राला दरमहा 1,000 ते 1,500 कोटी रुपयांचा टोल महसूल मिळणार आहे. मात्र एका कारला यामहामार्गावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागणार आहे, किंवा या महामार्गावर किती टोल असणार आहेत, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रवास करणे, एका अर्थाने थोडेफार खर्चिक ठरू शकते.

हा एक्सप्रेस वे भारतातील सर्वात मोठा हायवे ठरणार आहे. या हायवेचे काम लवकरच पूर्ण होणार असून हा महामार्ग मार्च 2022 ते 2023 दरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 90 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

 

हे ही वाचा  :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments