आपलं शहर

Mumbai train bombings : लोकलमध्ये विषारी गॅस सोडण्याचा प्लॅन फसला; दहशतवाद्यांच्या टार्गेटवर मुंबई लोकल का?

मुंबईच्या लोकलमध्ये विषारी गॅस सोडून हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता,

Mumbai train bombings : मागील आठवड्यात दिल्लीत सहा दहशतवाद्यांना सायबर सेलने अटक केली होती. त्यामुळे मुंबईसह सर्व प्रमुख शहरांतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. मुंबईतील ATS आणि गुन्हे शाखेनेही कंबर कसून तपासाला सुरुवात केली, त्याचं फलीस म्हणून नागपाडा परिसरात कट रचणाऱ्या दहशतवाद्याला ताब्यात घेतलं, त्यानंतर मुंबईत कुठे बॉम्ब ठेवणार, तो कसा असेल, अशा सगळ्या प्रश्नांची उकल समोर येऊ लागली.(The plan to release toxic gas into the locale failed; Why Mumbai Local on Terrorist Target?)

मुंबईच्या लोकलमध्ये विषारी गॅस सोडून हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, अशी प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांनी सादर केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाने या सगळ्या गोष्टींचा सुगावा लावला आहे.

ही माहिती मिळताच गुप्तचर विभागाच्या सूचनेनुसार रेल्वे पोलिसांकडून लोकल स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जर काही संशयास्पद आढळले तर दिलेल्या आदेशानुसार त्यांची कसून तपासणी केली जाईल आणि ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अनेक रेल्वे स्थानकांवरील मुख्य प्रवेशद्वार वगळता, इतर सर्व मार्ग बंद करण्याचा निर्णयही पोलिसांनी घेतला आहे.

या अगोदर देखील मुंबई शहरातील लोकल ट्रेनवर अनेक हल्ले झाले आहेत. 2006 साली मुंबईत अशाच प्रकारे पश्चिम उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता, हा बॉम्बस्फोट साखळी स्वरुपात घडवण्यात आला होता. एकाच दिवसात 7 बॉम्बस्फोट घडवणून आणले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व बॉम्बस्फोट 11 मिनिटांच्या कालावधीत घडवण्यात आले होते. हे सर्व बॉम्ब कूकरमध्ये ठेवण्यात आले होते, या हल्ल्यात जवळपास 209 लोक ठार तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते. हे सर्व बॉम्बस्फोट माटुंगा रोड, माहीम जंक्शन, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, भायंदर व बोरिवली या रेल्वे स्थानकातील परिसरात घडले होते. फैसल शेख, आसिफ खान, कमल अन्सारी, एहतेशाम सिद्दुकी,नवीन खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा स्फोट घडवून आणला होता.

एकदा लोकलमध्ये झालेल्या स्फोटमुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलमध्ये स्फोट होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली जात आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments