विद्यापीठ

Mumbai university : A++ नामांकन मिळाल्याबद्दल,उदय सामंत यांच्याकडून मुंबई विद्यापीठाच कौतुक…

मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठाला एकूण 3.65 गुण मिळाले आहेत.

Mumbai university : मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठाला एकूण 3.65 गुण मिळाले आहेत. हा दर्जा मिळवण्यासाठी राज्यातील इतर विद्यापीठांच्या एकूण तुलनेत सर्वाधिक गुण मुंबई विद्यापीठाने मिळवले आहेत. नॅककडून आज अधिकृतरित्या करण्यात आल्यानंतर विद्यापीठातील व्यवस्थापन सदस्य, सिनेट सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी 2012 साली 3 वर्षासाठी NAAC मूल्यांकन झाले होते. त्यानंतर विद्यापीठाचे NAAC मूल्यांकन विविध कारणास्तव रखडले होते. आता हे NAAC मूल्यांकन पुढील सहा वर्षासाठी असणार असल्याची माहिती आहे

महाराष्ट्राचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांना 2021 च्या अपवादात्मक NAAC रेटिंगसाठी अभिनंदन केले. त्यांनी सिनेट सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. योग्य पात्रताMumbai University appreciates Uday Samant for getting A ++ nomination …

मुंबई विद्यापीठाचे NAAC रेटिंग चार वर्षांपूर्वी संपले. मान्यताप्राप्तीसाठी पुन्हा अर्ज करण्यात अयशस्वी झाल्यामुळे MU ने 20 एप्रिल 2017 रोजी NAAC रेटिंग गमावले. 24 ऑगस्ट, 2021 रोजी NAAC च्या टीमने तपासणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कॅम्पसला भेट दिली. विशिष्ट विद्यापीठाचे NAAC रेटिंग अनेक अटींवर आधारित असते जसे की शिक्षण, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचे शिक्षण, विशिष्ट विद्यापीठाचा कारभार.

मुंबई विद्यापीठाला जागतिक स्तरावर पुन्हा एकदा सन्मान मिळावा आणि त्यामुळे नॅकचा दर्जा मिळावा म्हणून विद्यापीठाने यासाठीची जोरदार तयारी केली होती. विद्यापीठातील एकूण शैक्षणिक वातावरण, विकास कामे, संशोधन आणि विद्यापीठातील असलेल्या सोयी सुविधा,शैक्षणिक विकास आणि उद्योग, व्यवसायपूरक नवीन अभ्यासक्रम त्यामध्ये सागरी व्यवसाय शिक्षण, आभासी शिक्षण तसेच संशोधनात्मक प्रगती या सगळ्याच सादरीकरण मुंबई विद्यापीठाकडून नॅक कमिटीसमोर करण्यात आलं होतं. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी त्यासोबतच सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या या दर्जाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments