बीएमसी

mumbai update : मुंबईतील सर्व रस्त्यांचे कॉंक्रीटिकरण होणार? पहा 5 वर्षांचा संपूर्ण आराखडा…

दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईतील रस्त्यांची चाळण होत असते ,त्यामुळे नागरिकांना खडतर आसा खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो.

mumbai update : दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईतील रस्त्यांची चाळण होत असते ,त्यामुळे नागरिकांना खडतर आसा खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो.पालिकेला नागरिकांच्या रागाला सामोरे जावे लागते. राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांनी अनेक वेळा या सर्व घटना बाबत पालिकेचे वारंवार लक्ष वेधल्यानंतर पालिकेने आता रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे 2 हजार किमी लांबीचे रस्ते आहे. यात साधारण 5000 अंतर्गत रस्ते आहेत. त्यातील 300 रस्त्यांचे काम या काळात होणार असून, एक हजाराच्या आसपास रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

157 रस्तेकामे प्रस्ताव करण्यात आला, यंदाच्या मार्चपासून ऑगस्टपर्यंत सुमारे 1200 कोटींच्या निविदा रस्तेबांधणीसाठी काढण्यात आल्या आहेत. जून आणि जुलैमधील शंभर कोटीच्या निविदांचा यामध्ये समावेश आहे. यंदाच्या वर्षी 157 किमी रस्तेकामे प्रस्तावित असून त्यात 145 किमी सिमेंट काँक्रीट आणि 12 किमी डांबरी रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

मुंबईत एकूण रस्ते : अडीच हजार किमी

पालिकेच्या अखत्यारीत : 2055 किमी

डिसेंबर 2020 पर्यंत : सिमेंट काँक्रिटीकरण 750 किमी

कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुदर्शा, तसेच खड्ड्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने महापालिकेने आता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 6 मीटर रुंदीपर्यंतच्या सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा देखील तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईत दरवर्षी 100 किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. डिसेंबर 2020 पर्यंत मुंबईत 750 किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. काँक्रिटीकरणाच्या या वेगात पावसाचे पाणी जमिनीत मुरणार कसे, असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

पालिकेतर्फे दरवर्षी शंभर किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात येते . मुंबईचा विकास आराखडा 2034 मध्ये मुंबई शहरामध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि सतत वाढणारी वाहतूक याचा विचार करून रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेने रस्ते बांधणीचे नियोजन केले आहे. पालिकेच्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात रस्तेकामांसाठी तब्बल 1800 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments