आपलं शहर

mumbai update : मुंबईत तिसरी लाट उंबरठ्यावर, त्याआधीच मुंबईकरांचा मोठ्या संकटाशी सामना

संक्रमित लोकांच्या संख्येमुळे कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढताना दिसत आहे.

mumbai update : राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे देशात दररोज वर आणि खाली जाणाऱ्या संक्रमित लोकांच्या संख्येमुळे कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढताना दिसत आहे. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी देशात कोरोना लसीकरण जलद करण्यावर भर दिला जात आहे, परंतु यापूर्वी देशभरातील रुग्णालयांसमोर एक गंभीर आव्हान निर्माण झाले आहे.
राज्यात रुग्णालयांमध्ये तापाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, डेंग्यू, मलेरियामुळे तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय आणि रुग्णालयांमध्ये बेडचे संकट आहे.

कोरोनाचा महामारीमुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी रक्तदान कमी प्रमाणात झाले आहे.या व्यतिरिक्त डेंग्यूमुळे महाराष्ट्रातील रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, अनेक महिन्यांपूर्वी रक्ताची मागणी जारी होती, परंतु हे संकट अधिकच गडद होताना दिसत आहे, कारण कोरोना लसीकरण हे देखील कमी झाल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. आता परिस्थिती अशी आहे की मुंबईतील टाटा हॉस्पिटलला सोशल मीडियावर लोकांना रक्तदानासाठी आवाहन कराताना दिसत आहे .राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी साांगितले. डाॅ. थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, ” रक्ताचा तुटवडा सध्या सगळी कडे आहे. कारण, लसीकरण चालू आहे आणि लोक हि रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत.त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे.

 

हे ही वाचा :


 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments