आपलं शहर

Mumbai update : फेरिवाल्याची संपत्ती 25098000 रुपयांची, मुंबईत आहेत 10 घरे, रोज करतो विमानाने प्रवास…

ही संपत्ती तुम्ही पाहाल तर एका मंत्र्यांनादेखील लाजवले अशी आहे.

Mumbai update :एका फेरीवाल्याची संपत्ती केवढी असेल, असा प्रश्न जर तुम्हाला पडला, तर तुमच्याकडे त्याचं उत्तर काय असू शकते? साधारण त्याचा आकडा फक्त हजारांच्या पटीत असेल, मात्र मुंबईत असा एक फेरीवाला राहतो, ज्याच्याकडे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ही संपत्ती तुम्ही पाहाल तर एका मंत्र्यांनादेखील लाजवले अशी आहे.The peddler’s wealth is 25098000 rupees, there are 10 houses in Mumbai, he travels by plane every day …

या फेरीवाल्याचं नाव आहे संतोष सिंग उर्फ बबलू ठाकूर. 2010 साली बबलू उत्तर प्रदेशातून मुंबईत आला, हा फेरीवाला मुंबईतील सीएसटी ते कल्याण स्टेशन दरम्यान फेरिवाल्याचं काम करत होता, मात्र मधल्या काळापासून त्याने इतर सहकारी फेरिवाल्यांकडून हप्ता वसुलीचे काम सुरु केलं. अनेक रेल्वे स्थानकांवर त्याच्या फंटरचे नेटवर्क आहे. त्याच्या टोळीच्या माध्यमातून त्याने सामान्य फेरीवाल्यांकडून हप्ता वसुलीचे काम सुरु केले. जर त्या फेरीवाल्यांनी हप्ता दिला नाही, तर त्याच्या टोळीकडून इतर फेरीवाल्यांना मारहाण करणे, त्रास देणे अशा गोष्टी करण्यात येत असत.

युपीमधील सुलतानपूरमधून हा गर्भश्रीमंत फेरीवाला मुंबईत आला होता. संतोष सिंग उर्फ बबलू ठाकूर हा मुंबईत फेरीवाला म्हणून काम करत होता. परंतु संतोष सिंग हा फेरीवाला व्यतिरिक्त दुसऱ्या कामामुळे त्याच्याकडे गडगंड संपत्ती मिळू लागली. हप्ता वसुली, गुंडगिरी, दुसऱ्या फेरीवाल्यांना त्रास देणे अशा कामांमुळे सामान्य दिसणारा फेरीवाला बलाढ्य श्रीमंत झाला.

या त्रासाला कंटाळून त्यावर अनेक गुन्हेही दाखल केले आहेत. त्याच्यावर 2010 पासून एकूण 25 गुन्हे देखील दाखल आहेत. तरीही त्याच्या टोळीकडून त्रास देण्याचे प्रकार चालूच होते. त्यानंतर त्याच्या विरुध्द 7 मार्च 2021 रोजी पुन्हा गुन्हा दाखल करून मुंबई रेल्वेच्या विशेष पथकाकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. संतोष सिंग आणि त्याच्या टोळीला पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांची रवानगी भायखळा पोलीस ठाण्यात केली आहे.

मुंबईच्या फेरीवाल्यांकडून उकळलेली कोटींची संपत्ती त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे 2कोटी 50 लाख 98 हजारांची रोकड, मुंबईत 10 घरे, दीड किलो सोने, 2 महागड्या गाड्या, उत्तर प्रदेशात 5 एकर जमीन अशी संपती आहेत. तसेच गावी जण्या -येण्यासाठी तो चक्क विमानाने प्रवास करत असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments