आपलं शहर

Mumbai update : युनेस्कोच्या यादीत मुंबईतील इमारतींचा समावेश, पाहा कोणत्या इमारती आहेत सर्वाधिक ऐतिहासिक

या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि कला वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आल्याची घोषणा समितीच्या अध्यक्ष शैखा हाया रशेद अल खलीफा यांनी केली होती.

Mumbai update : दक्षिण मुंबईमधील 19 व्या आणि 20 व्या शतकातील व्हिक्टोरिअन गॉथिक पद्धतीच्या कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. बहरीनमधील मनामा येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा परिषदेची 42 वी परिषद 2 वर्षांपूर्वी झाली होती. या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि कला वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आल्याची घोषणा समितीच्या अध्यक्ष शैखा हाया रशेद अल खलीफा यांनी केली होती.(The buildings in Mumbai are included in the UNESCO list, see which buildings are the most historic)

महाराष्ट्रात सर्वात जास्त वारसा स्थळे

यापूर्वी अजिंठा, एलिफंटा, वेरूळ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत आदींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. आता त्यापाठोपाठ दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार असून भारतातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे.

मुंबईतील वारसा स्थळे

व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको पद्धतीच्या इमारती या जगभरात दिसून येतात. मात्र एकाच परिसरात एवढ्‌या मोठ्या प्रमाणात दोन्ही शैलीच्या इमारती या फक्त मुंबईतच आढळतात. युनेस्कोच्या यादीतील जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मुंबईतील इमारतींमधील उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तुशैलीच्या इमारती आहेत. तसेच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग, दिनशॉवाछा रोडवरील राम महल, इरॉस आणि रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारतींचा यामध्ये समावेश आहे.

या वास्तूंचे नामांकन केल्याचे पत्र युनेस्कोच्या तांत्रिक सल्लागार समिती असलेल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर मोमेंटस अँड साईटस् या समितीने राज्य शासनाला पाठविले होते.

19 व्या व 20 व्या शतकातील दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या अद्वितीय वास्तुरचना मुंबई वगळता इतर कुठल्याही शहरात आढळून येत नाहीत. मुंबईने 1995 मध्ये वारसा नियमावली तयार केली असून नागरी संवर्धनामध्ये महाराष्ट्र देशात अग्रगणी ठरला आहे. संवर्धन व विकास यांचा समतोल साधून अनोखी वारसा व्यवस्थापन यंत्रणा तयार केली आहे,’ असे नगर विकास खात्याचे सचिव करीर यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments