नॅशनल

Mumbai Updates: दिल्ली पोलिसांनी टाळला मोठा धोका पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये मुंबईतील दहशतवादी सामील

दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.

Mumbai Updates :दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईतलाच असल्याची माहिती समोर आली. दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.

पाकिस्तानी दहशतवादी मॉडेलचं मुंबई कनेक्शन समोर आले आहे. हे दहशतवादी उत्तरप्रदेशातील निवडणुका आणि मुंबईत घातपात करण्याच्या तयारीत होते. तसेच या दहशतवाद्यांना मुंबईतून पैसा देखील पुरवला गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दाऊद इब्राहिमच्या भावाचा पाठिंबा असल्याचे दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी पसरलेले आहेत.

महाराष्ट्रात सणासुदीचा दिवसात दहशतवादी धमाके करणार होते. दहशतवादाचे नाव नावजान मोहम्मद शेख, ओसामा, मूलचंद आणि मोहम्मद अबू बकर अशी चौघांची नावं आहेत. कोर्टाने या चौघांना 14 दिवसांच्या पोलीस कस्टडीत पाठवण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया 47 हा . शेख हा सायन येथील सोशननगरमधील केलाबखार परिसरातील खोली क्रमांक 185 मध्ये दोन मुली आणि पत्नीसोबत येथे राहतो. त्याच्या कुटुंबियांची एटीएस कडून चौकशी सुरू आहे. त्याच्या एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून, दुसरी मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments