समाजकारण

Mumbai updates :मुंबई ते सिंधुदुर्ग जोडणारा महामार्ग मुंबईकरांना मिळणार दिलासा

भविष्यात वरळी ते थेट सिंधुदुर्गला केवळ साडेतीन तासांत जाता येणार आहे.

Mumbai updates  :कोकणात जाण्यासाठी सध्या वाहनचालक आणि प्रवाशांना कसरतच करावी लागते .मुंबई-गोवा ( Mumbai Goa highway ) महामार्गाचे काम रखडल्याने हा प्रवास आणखी त्रासदायक होतो. परंतु भविष्यात वरळी ते थेट सिंधुदुर्गला केवळ साडेतीन तासांत जाता येणार आहे. राष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना दिलासा मिळेल.

कोकण द्रुतगती मार्ग मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास सुकर करणारा ठरणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास राज्य सरकारची मंजुरी मिळाल्याबरोबर या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वर्षभरात आराखड्याचे काम पूर्ण करून प्रकल्पाला आर्थिक, प्रशासकीय मंजुरी आणि इतर सर्व प्रकारच्या परवानग्या घेत पुढील दोन वर्षात प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

काम सुरू झाल्यापासून चार ते पाच वर्षांत ते पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असून 2027-28 मध्ये हा द्रुतगती मार्ग वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबई-सिंधुदुर्ग कोकण सागरी मार्गाच्या मधून जाणार आहे. त्यामुळे सागरी कोकण मार्गाचे कामही एमएसआरडीसीकडून केले जाणार असून भविष्यात अंदाजे 540 किमीचा सागरी मार्गही कोकणात जाण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ( Msrdic future bridge )

‘ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे’चा बृहत् आराखडा चार पॅकेजमध्ये तीन कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. यासाठी ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच नेमका हा मार्ग किती किमीचा असेल, यासाठी किती खर्च येईल, किती जमीन संपादित करावी लागेल यासह अनेक बाबी निश्चित होणार आहेत. असे असले तरी हा प्रकल्प अंदाजे ४०० किमीचा असेल, यासाठी साधारणत: 70 हजार कोटी रुपये खर्च येईल, तर अंदाजे 4 हजार हेक्टर जमीन संपादित करण्याची गरज असल्याचा अंदाज आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments