फेमस

Mumbaicha Raja 2021 : मुंबईच्या सर्वात जुन्या गणपतीचे दर्शन कसे घ्याल, पहा काय आहे नियोजन

यावर्षी विशाल गणेश मूर्ती ऐवजी छोटी म्हणजेच 4 फुटाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

Mumbaicha Raja 2021 :यंदा कोरोनाचे सावट गणेशोत्सवावरही पडताना दिसत आहे. मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या गणेश गल्लीतील मुंबईच्या राजा मंडळाने यंदाचा गणेशत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी विशाल गणेश मूर्ती ऐवजी छोटी म्हणजेच 4 फुटाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. हे मंडळ आपल्या भव्य मूर्तीसाठी आणि आकर्षक सजावटीसाठी मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.How to visit Mumbai’s oldest Ganapati, see what is planning

मुंबईचा राजा मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी सांगितले की प्रशासनाच्या आदेशानंतर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तीची उंची केवळ चार फूट ठेवण्यात आली आहे.  यापूर्वी मुंबई राजाच्या मूर्तीची उंची ही २२ फुटांच्या आसपास असायची. तसेच यंदा बाप्पाची मिरवणूक न काढता कृत्रिम तलावात गणपती विसर्जन केले जाणार आहे.

तसेच गणेशगल्ली मंडळाने भाविकांसाठी ‘लाइव्ह दर्शन’ची सोय  उपलब्ध करून दिली आहे.दरम्यान मुंबईच्या राजाचे आगमन हे 10 दिवसांसाठी होत असते.गणेशगल्ली च्या युट्युब पेजवर गणपती बाप्पाची आरती नियमित 10 दिवस ऑनलाईन दाखवली जाणार आहे. त्यामुळे यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरीच राहून बाप्पाचं दर्शन आपण घेऊ शकतो आणि विघ्नहर्त्याकडे सर्वांचेच कोरोनापासून रक्षण करण्याची प्रार्थना करू शकतो.

गणेश गल्लीच्या राजाचे ‘लाईव्ह दर्शन’

फेसबूक पेज – facebook.com/GaneshGalli

इंस्टाग्राम – instagram.com/raja_mumbaicha/

वेबसाईट- mumbaicharaja.co

युट्युब चॅनल – youtube.com/c/MumbaiChaRaja22/featured

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments