Mumbai’s famous Vadapav : इलुकल्या वडापावची मोठी कहाणी, पाहा मुंबईतला पहिला वडापाव कसा तयार झाला?
वडापावची सुरुवात नेमकी कशी झाली? त्याचा इतिहास काय, हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊया, वर्ल्ड बेस्ट वडापावची सुरुवात नेमकी कशी झाली.

Mumbai’s famous Vadapav : मुंबईमध्ये खूप काही पाहण्यासारखे आणि खाण्यासारखे आहे. अनेक प्रसिद्ध ठिकाणे, लोकल आणि मुंबईतील स्ट्रीट फूड. मुंबईत स्ट्रीट फूडमध्ये सगळ्यात जास्त खाल्लं जाणार, सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव. वडापाव हे मुंबईकरांच्या बिजी लाईफमध्ये अगदी उत्तम, पोट भरू आणि कमी पैशात उपलब्ध होणारा पदार्थ आहे. वडापावचे स्टॉल हे सर्वत्र पाहायला मिळतील. त्यामुळे वडापावची चव ही गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनी चाखली आहे. वडापाव न आवडणारी व्यक्ती तशी दुर्मिळच आहे. परंतु, वडापावची सुरुवात नेमकी कशी झाली? त्याचा इतिहास काय, हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊया, वर्ल्ड बेस्ट वडापावची सुरुवात नेमकी कशी झाली. (The big story of Ilukalya Vadapav, see how the first Vadapav was made in Mumbai?)
कसा झाला जन्म?
खरतर मुंबईमध्ये वडापावचा जन्म 1966 मध्ये झाला. दादर स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्य नावाच्या व्यक्तीने एक प्रयोग केला. त्यांची स्वत:ची चपाती आणि भाजी विकायची गाडी होती. त्यावेळेस चपाती आणि भाजी उरली होती, सोबत त्यांच्याकडे काही पावाचे तुकडेही होते. एकदिवशी त्यांच्याकडे हे सगळं थोड्याफार प्रमाणात उरलं होतं. त्यांच्यांवर एक प्रयोग करायचा त्यांनी ठरवला. बटाट्याची भाजी होती, भज्यांसाठी बेसनाचे पीट होतं, त्यांनी त्याच बटाट्याच्या भाजीचा कुस्कारा केला, त्याचा एक गोळा बनवला आणि बेसनाच्या पिठात पाणी टाकून ते थोडं पातळ केलं व नंतर तो गोळा पिटामध्ये बुडवून तो तापलेल्या तेलात सोडला. आता तो पिटाचा गोळा भज्यांसारखा भाजू लागला होता. तो गोळा पूर्णपणे भाजल्यावर त्याला बाहेर काढण्यात आलं. बाहेर काढल्यानंतर त्याची अशोक वैद्यांनी पावासोबत चव चाखली.
तळलेल्या भाजीचा गोळा चपातीपेक्षा पवासोबत खूपच रुचकर लागतो, असं अशोक वैद्यांना समजलं. हे समजल्यावर त्यांनी चपातीचा ऑप्शन रद्द करून पूर्णपणे पावांवर जोर दिला, तिथून पुढे सुरु झाला वडापावचा प्रवास.
वडापाव कसा फेमस झाला?
सुरुवातील लालबाग, दादर, परेल, गिरगाव अशा भागात अनेक सुतगिरण्या होत्या. त्या गिरण्यांमध्ये अनेक गरिब मजूर कामगार होते. त्यांच्यांकडे त्यांच्या खर्चा इतके पैस नसायचे, त्यामुळे रोज महागडं जेवण खाणे त्यांना परवडत नसायचे, अशांसमोर एक पर्याय उभा राहिला, तो म्हणजे वडापाव. अनेकांनी दुपारचं जेवण म्हणून वडापावला पसंती दिली. 2 वडे आणि 2 पावांमध्ये पोट भरून जायचं, पावांमुळे लवकर भूकही लागत नसे. त्यामुळे ज्या ठिकाणी सूत गिरण्या आणि इतर उद्योग असायचे, त्याठिकाणी वडापावच्या गाड्या सुरु होऊ लागल्या.
1970 ते 1980 च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्याने, त्यानंतर अनेक तरुणांनी रोजगार मिळवण्याचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या ठिकठिकाणी सुरु केल्या. त्यानंतर मुंबईच्या गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. याचबरोबर शिवसेनेनेही मुंबईत आलेल्या दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन पुकारले होते. याचाच एक भाग म्हणून काही शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली होती. या सर्व गोष्टींमुळे मुंबई व परिसरात वडापावची लोकप्रियता अधिकच वाढली. त्या काळात शिवसेनेने देखील स्वतःची अशी ‘शिव वडापाव’ची सुरुवात केली होती.
त्यावेळी गरीबांनाही परवडेल अशा दरात वडापाव मिळत असल्याने तो कमीवेळातच खूप लोकप्रिय झाला. त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली आपल्याला पाहायला मिळाली. मुंबईत वडापावची सुरुवात झाली तेव्हा त्याची किंमत अगदी 10 पैसे इतकी होती. आजच्या काळात बटाटावडा इंडियन बर्गर म्हणूनही ओळखलं जाऊ लागलंय आजच्या काळात आपल्याला वडापावचे अनेक प्रकार व वेगवेगळ्या किंमती पाहायला मिळतील.
वडापाव हे मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले आहे. मुंबईच्या वडापावने जगभरात देखील आपली मजल मारली आहे. आज आपल्याला बाजारात वडापावचे अनेक प्रकार दिसतील, जसे की मॅगी वडापाव, चिवडा वडापाव, चकली आणि लेस वडापाव, चीज फोन्डू वडापाव, जैन वडापाव, चिकन वडापाव, बेकन वडापाव, बाव वडापाव,चीज व मेयोवडापाव असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतील, या वेगवेगळ्या प्रकारांप्रमाणेच त्यांची चवही वेगवेगळी आहे.
या अस्सल देशी फास्ट फूडचा सेलिब्रेशन करण्यासाठी 23 ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस म्हणूनही जगभर साजरा केला जात आहे.
The famous #Mumbai #food item #vadapav is getting a lot of attention these days, with the #hongKong newspaper, @SCMPHongKong , publishing a history about the dish, including that the #British High Commissioner to India Alex Ellis had tweeted about it!https://t.co/mByiB3S5Hn
— Rajat N Agrawal, MD (@RajAgra) September 15, 2021
हे ही वाचा :