क्राईम

Varadarajan Mudaliar | मुंबईचा पहिला हिंदू डॉन, पोलिसांना डॅशिंग पद्धतीने भेटायचा

सगळ्यात मद्रासी लोकांची अंडरवर्ल्ड टोळी होईल, असं कोणाला चुकुनही वाटलं नव्हतं, मात्र तसं झालं.

Varadarajan Mudaliar | मुंबईवर एकेकाळी पोलिसांचं नाही, तर अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Dawn) लोकांचं राज्य चालायचं. त्यांच्याकडून होत असलेली तस्करी, दहशत, लोकांना मारहाण, दादागिरी असे अनेक किस्से आज ऐकले, तर त्यावर आपला विश्वास बसणार नाही, मात्र हे सगळं खरं आहे. अशाच एका पहिल्या हिंदू डॉनची कहाणी आज आपण पाहणार आहोत.

varadarajan mudaliar illustrated weekly ft 130513

मुंबईमध्ये अनेक मद्रासी नागरिकांनी येण्यास सुरुवात केली होती, जितकं जमेल तितकं काम करायचं, रोजी रोटी कमवायची आणि आपल्या गावी जायचं, असाच अनेकांचा व्यवसाय सुरु असे, मात्र या सगळ्यात मद्रासी लोकांची अंडरवर्ल्ड टोळी होईल, असं कोणाला चुकुनही वाटलं नव्हतं, मात्र तसं झालं.

वरदराजन मुदलियार. (Varadarajan Mudaliar) वरदाला काळा बाबू म्हणूनही ओळखले जात असे. काहींनी त्याला मुंबईचा पहिला हिंदू अंडरवर्ल्ड डॉन म्हणूनही नाव ठेवलं होतं, असे म्हटले जाते की यासारखा डॉन मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये कधीच घडला नाही आणि घडणार नाही.

Varadarajan Mudaliar 20180318120352

वरदराजन यांची पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याची पद्धत अजूनही एक ऐतिहासिक किस्सा आहे. ‘डोंगरी से दुबई’ या पुस्तकात, प्रख्यात पत्रकार हुसेन जैदी यांनी वरदराजन मुदलियार याच्याबद्दल एक किस्सा सांगितला आहे. एकेदिवशी पोलिसांच्या टेबलवर काळ्या रंगाचे पेय असलेला एक ग्लास येऊन ठेवण्यात आला. ग्लास आणि त्यातील काळ्या रंगालीत पेय पाहून संपूर्ण पोलीस स्टेशन रिकामी झाले. सर्व पोलीस कर्मचारी कार्यालयातून बाहेर पडले. ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या टेबरवर तो ग्लास ठेवला जाईल, तो सर्व काम सोडून डॉनची वाट पाहत उभा बसे, हा वरदराजन येण्याचा संकेत असे. टेबरवर काळ्या रंगाचे पेय असलेला ग्लास पोहचला म्हणजे वरदराजनचा मेसेज आला की तो त्याला भेटायला येतोय.

मद्रासी गँगबाज जेव्हा मुंबई अंडरवर्ल्डच्या जगात उतरला, तेव्हा त्याने खूप वेगाने आपले नाव कमावले. वरदराजन मुदलियारच्या परवानगीशिवाय पोलीससुद्धा त्याच्या भागात जात नसायचे.

बोलण्याची कला

वरदराजन खूप बोलका व्यक्ती होता. त्याला जो कोणी भेटायचा, तो त्याच्या मनावर राज्य करायचा. व्हीटी स्टेशनवर (आताचे छत्रपती शिवाजी महराज टर्मिनस) वरदराजन कुलीचं काम करत होता, त्यावेळी त्याला काही दारू तस्कर भेटले. वरदराजनला आतापर्यंत यांना आतापर्यंत समजले होते की कुलीच्या कमाईला पोसणे खूप कठीण आहे. तोही या तस्करांशी जोडला गेला आणि दारूच्या व्यवसायात उतरला.

आधी वरदराजनने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दारू पोहचवण्याचं काम करू लागला, मात्र काही दिवसांनी त्याने स्वतःची टोळी तयार करून तस्करीला सुरुवात केली. लोकांनी या टोळीला मद्रासी गँगबाज असे नाव दिले.

जेव्हा वरदराजन गुन्हेगारीच्या जगात आपला अड्डा बनवत होता, तेव्हा हाजी मस्तान आणि करीमलाला एकत्र मुंबईवर राज्य करत होते. वरदराजनला समजले होते की हाजी मस्तानच्या परवानगीशिवाय तो मुंबईत आपला व्यवसाय वाढवू शकणार नाहीत. त्याचवेळी वरदराजन हाजी मस्तानला भेटायला गेला आणि त्यालाही आपल्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवलं. अखेर वरदराजनला हाजी मस्तानकडून 2 नंबरचा व्यवसाय करण्याचं ग्रीन कार्ड मिळालं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments