फेमस

Mumbai’s gold Ganpati : सोन्याच्या गणपतीचा संपूर्ण इतिहास, पाहा, कसं आहे अनेक मुंबईकरांचं श्रद्धास्थान…

दिवेआगर हे गाव प्रसिद्ध तेव्हा झाले; जेव्हा 'संकष्टी चतुर्थी', 17 नोव्हेंबर 1997 च्या शुभ दिवशी, सोन्याने बनवलेली गणपतीची प्राचीन अर्धी मूर्ती एका शेतात सापडली.

Mumbai’s gold Ganpati :  गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातलाच लोकप्रिय सण नसून संपूर्ण जगभरात गणपतीची आराधना केली जाते. तसेच महाराष्ट्रात अनेक लोकप्रिय आणि प्रसिद्ध गणपतीचे देवस्थाने आहेत. भाविक खूप श्रद्धेने अशा मंदिरांमध्ये गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. मग तो कोणताही दिवस असो, परंतु गणेश चतुर्थीला खूप मोठ्या संख्येने भाविक महाराष्ट्रातील गणेश मंदिरांना भेटी देत असतात. अशाच एका गणपती बाप्पाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का, की मुंबईत सोन्याच्या गणपतीचे मंदिर कुठे आहे, चला तर मग, आपण या खास आणि आकर्षक गणपतीच्या मंदिराबद्दल आणि प्रसिद्ध बाप्पाबद्दल जाणून घेऊया.The entire history of the golden Ganapati, look, how is the place of worship of many Mumbaikars …

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेले एक छोटेसे गाव आहे. मुंबईपासून अंदाजे 170 किलोमीटर अंतरावर हे गाव वसलं आहे. हे गाव अतिशय शांत, स्वच्छ आणि कमी लोकवस्तीचे आहे. या निसर्गरम्य छोट्याशा गावात काही मंदिरे आणि सुंदर समुद्रकिनारा आहे.

दिवेआगर हे गाव शिलाहार राजांची प्राचीन राजधानी होती. दिवेआगर हे गाव प्रसिद्ध तेव्हा झाले; जेव्हा ‘संकष्टी चतुर्थी’, 17 नोव्हेंबर 1997 च्या शुभ दिवशी, सोन्याने बनवलेली गणपतीची प्राचीन अर्धी मूर्ती एका शेतात सापडली. जी आता सुवर्ण गणेश नावाच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे. या सुवर्ण गणेश मंदिरामागची कथा खूपच रोचक आणि मनाला भावणारी आहे.

तिथल्या रहिवाशी असलेल्या द्रोपदी पाटील या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु होते. जमिनीखाली सुमारे 40-50 सेंटीमीटरपर्यंत खोल एक तांब्याची पेटी सापडली. त्या तांब्याच्या पेटीचे वजन 30 किलो होते. ही तांब्याची पेटी सुमारे 1000 वर्षापूर्वींची असावी, असा अंदाज बांधण्यात आलाय. तांब्याच्या पेटीवर संस्कृतमध्ये 10 व्या शतकांत लिहिलेले काही शब्द होते. या पेटीच्या आधी, त्याच ठिकाणी एक तामपात्रा सापडली होती आणि म्हणूनच या घटनेने गावातील प्रत्येकाला आकर्षित केले होते.

या तांब्याच्या पेटीत 52 कॅरेट सोन्याची 1.32 किलो वजनाची गणपतीची मूर्ती व काही दागिने होते. म्हणून त्या ठिकाणी एक मंदिर बांधण्यात आले, त्या मंदिराला सुवर्ण गणेश मंदिर असे नाव देण्यात आले. दिवेआगरचे रहिवासी भक्तीने लोक गणेशाची पूजा करतात.

निळाशार अथांग समुद्र, गर्द माडाची बने, नारळ सुपारीच्या झाडांखाली लपलेली ती सुंदर कौलारू घरे, गावातून जाणारे सुंदर रस्ते, दुतर्फा हिरवाइने नटलेले, कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले आणि या सगळ्यात असलेलं हे सुंदर सुवर्ण गणेशाचे मंदिर, असं याचं वर्णन करता येईल. भेट देण्यासाठी व पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना ह सगळं दृष्य मोहून टाकणारं आहे, तुम्हीही या निसर्ग सौंदर्याचं दर्शन नक्की घ्यावं, हीच अपेक्षा.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments