क्राईम

Mumbai Crime : मुंबईमध्ये सगळ्यात सुरक्षित महिला, मात्र 2021 मुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरला…

Mumbai Crime : राज्यातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. राज्यात सर्वत्र भयाण अवस्था निर्माण झाली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एका मागोमाग एक अनेक धक्के देणारे गुन्हे समोर येत आहेत. 24 तास वर्दळ असलेल्या मुंबईमधूनही देखील बलात्काराची घटना समोर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Mumbai’s Sakinaka case, why injustice to women in what is considered the safest place)

मुंबईतील साकीनाका (Mumbai Sakinaka) परिसरात एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. नराधमाने विकृत बुद्धीने महिलेची अवहेलना केली होती. गंभीर जखमी असलेल्या पीडितेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे. मोहन चौहान असं आरोपीचं नाव आहे.

साकीनाका पोलिसांनी हा गुन्हा करणाऱ्या आरोपींविरोधात भादंविच्या कलम 376 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोहन चौहान अशा नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

निर्भया’सारख्या होणाऱ्या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. उल्हासनगरमधील रेल्वे स्टेशन परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशीला सुरुवात झाली आहे. पीडित मुलगी शिर्डीहून कल्याण येथे खासगी बसने आली होती. त्यावेळी उल्हासनगर स्थानकास लागून असलेल्या स्कायवॉकवर ही पीडित अल्पवयीन मुलगी उभी होती.

मुलीला जबरदस्ती करून रेल्वे क्वार्टरमधील एका वेगळ्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. त्यानंतर पीडितेला घटनास्थळी ठेवून आरोपीने तिथून पळ काढला. पीडीतेचा माहितीनुसार याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात आठ दिवसांपूर्वी एका 13 वर्षाच्या लहान मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केला. आरोपीने तिला फुटपाथवरुन उचलून नेत तिचं अपहरण केलं होतं. आरोपी हा एक रिक्षा चालक होता. या रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर पीडीतेवर सध्या उपचार सुरु आहेत.

मुंबई हे शहर महिलांच्या सुरक्षेसाठी माणलं जातं, सगळ्यात जास्त महिला मुंबईमध्ये स्वातंत्रपणे वागत असतात, फिरत असतात, मात्र अचानक त्यांच्यावर सुरु झालेल्या आत्याचारामुळे अनेक महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments