Nehru Planetarium : तुम्हाला अवकाशदर्शन करायचे आहे का? तर नक्की भेट द्या मुंबईच्या नेहरू तारांगणाला…
हे विज्ञान व मानवतेच्या अभ्यासासाठी केंद्र म्हणून स्थापित करण्यात आले होते. तब्बल 5 वर्षांनंतर म्हणजेच 3 मार्च 1977 रोजी तारांगणाचे उद्घाटन करण्यात आले.

Nehru Planetarium : आपण आपल्या कामानिमित्त नेहमीच व्यस्त असतो. कधी निवांतपणे बसून गप्पा मारण्याचा किंवा अवकाशाकडे निवांतपणे बसून बघत राहण्याचा वेळही नसतो, तर मुंबई किंवा इतर शहरामध्ये झालेल्या मोठमोठ्या बिल्डिंगस, टॉवर्समुळे आपल्याला रात्री ताऱ्यांनी लुकलूकणारे अवकाशही पाहता येत नाही, परंतु मुंबईत प्रसिद्ध असलेल्या नेहरू तारांगनाला भेट देऊन आपण तेथे ताऱ्यांच्या दुनियेत रमू शकतो. अवकाशाची सैर करण्याचे आनंद घेऊ शकतो. तुम्ही एकदा तरी या नेहरू तारांगनाला नक्की भेट द्या.(Do you want to explore? So definitely visit Mumbai’s Nehru Planetarium …)
मुंबईतील नेहरू तारांगण हे तुम्हाला अवकाशाच्या अद्भूत विश्वात घेऊन जाते. लहान मुलांना खगोलशास्र शिकवण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. तारांगणाच्या या गोलाकार वास्तूमध्ये 600 लोक एकत्र बसून अवकाशदर्शन करू शकतात. शिक्षणाबरोबरच येथे आपले मनोरंजनही होते.
नेहरू तारांगण हे 1972 मध्ये नेहरू सेंटरचा एक भाग म्हणून बांधण्यात आले आहे. हे विज्ञान व मानवतेच्या अभ्यासासाठी केंद्र म्हणून स्थापित करण्यात आले होते. तब्बल 5 वर्षांनंतर म्हणजेच 3 मार्च 1977 रोजी तारांगणाचे उद्घाटन करण्यात आले. हे तारांगण त्याच्या दंडगोलाकार रचना व सुंदर पांढऱ्या घुमटासह, प्लॅनेटोरियमची अनोखी वास्तुकला सर्वांचेच लक्ष वेधून घेते.
गेल्या अनेक वर्षांपासून नेहरू तारांगण व नेहरू केंद्र हे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, संशोधक, ज्यांना इतर ग्रहांचा अभ्यास व अवकाशातील हालचालींचा अभ्यास करण्याची आवड आहे. त्यांच्यासाठी हे तारांगण पसंतीचे ठिकाण बनले आहे. तसेच येथे विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, खगोलशास्त्र-आधारित चित्रकला स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.
नेहरू तारांगण हे सोमवारी व एखाद्या सुट्टीच्या दिवशी बंद असते, तर मंगळवार ते रविवारपर्यंत ते पर्यटकांसाठी खुले असते. हे सकाळी 11 वाजता उघडते व संध्याकाळी 5 वाजता बंद केले जाते. नेहरू प्लॅनेटोरियम तिकिटाची किंमत 100 रुपये प्रति व्यक्ती आहे. जर तुम्ही टीमनुसार भेट देणार असाल, तर तुम्हाला सवलतीच्या दरांचा देखील लाभ घेता येईल.
नेहरू तारांगणमध्ये दिवसभरात चार शो होत असतात.पहिला शो दुपारी 12 वाजता सुरू होतो व त्याचे वर्णन हिंदीत केले जाते,तर दुसरा व तिसरा शो हा मराठीत होत असतो. दुसरा शो दुपारी 1:30 वाजता सुरू होतो व तिसरा दुपारी शो 3 ला सुरू होत असतो.तसेच लास्ट शो हा पुन्हा हिंदीमध्ये संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होतो.नेहरू तारांगण हे नेहरू सेंटर, डॉ. अँनी बेंझट रोड, लोटस कॉलनी, वरळी, मुंबई येथे आहे.
Nehru Planetarium of Nehru Centre, Mumbai was inaugurated on 3rd March 1977 by than late Indiraji Gandhi #NehruPlanetariumCompletes40Years pic.twitter.com/RT0uHWRyaf
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 4, 2017
हे ही वाचा :
- Mumbai Cricket History : कोण आहे चंदू बोर्डे, मुंबई संघाला नाचवलं होतं स्वत:च्या तालावर, पाहा साताऱ्यात रंगलेला धमाकेदार सामना
- Electric buses : मुंबईत ‘या’ दिवसापासून धावणार 1900 इलेक्ट्रिक बस, पाहा कसं असेल मॅनेजमेंट
- Mumbai attack : 12 मार्च, 12 ठिकाणी स्फोट, शेकडो जणांचा मृत्यू, पहा कसा घडला मुंबई हल्ला