मंत्रालय

Prajakta Tanpure | फूटपाथवर राहणाऱ्या लोकांमध्ये जाऊन मिसळणारा भन्नाट राज्यमंत्री

मंत्री म्हटलं की पांढरा नेहरु, त्यावर रंगीबेरंगी जॅकेट, पायात कोल्हापूरी चप्पल आता पॅशन बदलल्याने मऊशार चप्पल, असा रुबाबदार थाट पाहायला मिळतो.

Prajakta Tanpure | मंत्री म्हटलं की पांढरा नेहरु, त्यावर रंगीबेरंगी जॅकेट, पायात कोल्हापूरी चप्पल आता पॅशन बदलल्याने मऊशार चप्पल, असा रुबाबदार थाट पाहायला मिळतो. मात्र काही मंत्री अतिषय साधे राहणीमान आणि कृतीशील असतात. साधा पांढरा शर्ट, काळी पॅंट आणि खिशाला 10 रुपयाचे पेन लावून प्रश्न तेथे ‘जनता दरबार’ भरवणारे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. (Prajakta Tanpure mingling with people living on the sidewalk)

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अशाच एका भन्नाट कारणामुळे सध्या चर्चेत आहेत. अचानकपणे प्राजक्त तनपुरे यांनी विना पोलीस प्रोटेक्शन एका साध्या गाडीतून थेट मंत्रालायासमोरील फुटपाथवर राहणाऱ्या पारधी समाजाच्या वस्तीला भेट दिली. त्यांच्या समस्या, त्यांची विचारपूस, त्यांचे विविध प्रश्न समजून घेण्याचा तनपुरे यांनी प्रयत्न केला.

पारधी समाजातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसं मिळतं, याची प्रत्यक्ष माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जाणून घेतली. ‘शिक्षण परीवर्तनाचे माध्यम आहे, त्यामुळे चिमुकल्यांनी शिक्षण घेण्याचा सल्ला तनपुरे यांनी केला. त्यामुळे वस्तीवरील नागरीक भारावून गेले. लहान मुले कुतुहलाने पाहत होती. आपल्याशी एक मंत्री बोलतोय हे समजण्यासाठीच त्यांचा काही वेळ गेला.

पारधी कुटुबांतील मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी तातडीने मंत्रालयात बैठक बोलावण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. असंच जर जिथे काम तिथे मंत्री उभा राहिला, तर या राष्ट्राची महासत्ता व्हायला जास्त वेळ लागणार नाही, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments