विद्यापीठ

Re-examination of MHT-CET : MHT-CET च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी;पुन्हा होतील परीक्षा…

काल झालेल्या जोरदार पावसामुळे जे विद्यार्थी MHT-CET परीक्षांमध्ये व इतर अभ्यासक्रमांना बसू शकले नाहीत त्यांच्या परीक्षांचे शेड्यूल पुन्हा केले जाईल.

Re-examination of MHT-CET :काल मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पावसामुळे विविध भागात पूर स्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे सर्वत्र ट्रॅफिक जाम झाली होती. काल विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या MHT-CET च्या परीक्षा होत्या,त्या परीक्षांमध्ये विद्यार्थी बसू शकले नाही.(Good news for MHT-CET students; exams will be held again …)

MHT-CET च्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांसंदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, काल झालेल्या जोरदार पावसामुळे जे विद्यार्थी MHT-CET परीक्षांमध्ये व इतर अभ्यासक्रमांना बसू शकले नाहीत त्यांच्या परीक्षांचे शेड्यूल पुन्हा केले जाईल.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पूर परिस्थितीमुळे बरेच विद्यार्थी CET परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना CET परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. या परिक्षांसंदर्भात नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

मराठवाडा,औरंगाबाद, नांदेड व लातूर या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना ही काल झालेल्या जोरदार पावसामुळे MHT-CET व बी फार्मसी, डी फार्मसीची पूर्व परीक्षा देता आली नाही. या परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 च्या दरम्यान होत्या.परीक्षा केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर जास्त पाणी असल्याने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.तयामुळे राज्य सरकारने या परीक्षांचे नियोजन पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments