आपलं शहर

Recruitment in MMRDA : MMRDA मध्ये नोकरीची संधी;पहा कोणत्या पदावर होणार भरती…

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावे. कारण या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑक्टोबर 2021 आहे.

Recruitment in MMRDA : मुंबईत तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का?तर मुंबईमध्ये तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध आहे. मुंबईच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) या विभागामध्ये ‘मुख्य अग्निशमन अधिकारी’‘अग्निशमन अधिकारी’ या पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी MMRDA या विभागातर्फे एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.(Job opportunities in MMRDA; see which post to be recruited …)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य अग्निशमन अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून झालेले असावे व अग्नि अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा प्रगत डिप्लोमा केलेला असावा, तसेच त्या उमेदवाराकडे अनुभव ही असायला हवे. तर अग्निशमन अधिकारी या पदावरही अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून झालेले असावे. अग्नि अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा प्रगत पदविका असणे आवश्यक आहे.

या पदांच्या भरतीची निवड प्रक्रिया ही प्रतिनियुक्तीच्या आधारावर केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावे. कारण या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑक्टोबर 2021 आहे.

पात्र उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करू शकता. ही अर्ज प्रकिया ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांनी खबरदारी घ्यावी. तुम्ही पुढील ई-मेल आयडीवर अर्ज पाठवू शकता.

मुख्य अग्निशमन अधिकारी – [email protected]

अग्निशमन अधिकारी – recruitment.fo@mmmocl.co.in

मुख्य अग्निशमन अधिकारी व अग्निशमन अधिकारी या पोस्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकला भेट द्या https://mmrda.maharashtra.gov.in/home

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments