खूप काहीस्पोर्ट

Ind vs eng : चौथ्या टेस्ट दरम्यान रोहित आणि पूजाराला झाली दुखापत.. पाचव्या आणि शेवटच्या टेस्टला मुकणार ?

Ind vs eng : भारत आणि इंग्लंडच्या दरम्यान पाच टेस्ट सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे. त्यामध्येच आता भारतीय संघासाठी चिंता वाढवणारी बातमी आता समोर येत आहे.

Ind vs eng : भारत आणि इंग्लंडच्या दरम्यान पाच टेस्ट सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे. ( India tour of england ) त्यामध्येच आता भारतीय संघासाठी चिंता वाढवणारी बातमी आता समोर येत आहे.

येणाऱ्या 10 सप्टेंबरला भारत विरुद्ध इंग्लंड असा पाचवा आणि शेवटचा टेस्ट सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधीच भारतीय संघामधील दोन प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे. ( Rohit and Pujara Injured during 4th test ) त्यामुळे पाचव्या टेस्टमध्ये त्यांच्या खेळण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हाती आलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि चेतेश्वर पूजारा यांना चौथ्या टेस्ट दरम्यान दुखापत झाल्याचे समजले आहे. चौथ्या टेस्टमध्ये शतक बनवणाऱ्या रोहित शर्माला गुडघ्याामध्ये दुखापत झाल्याचे समजले आहे. तसेच पूजारा देखील Ankle Injury ने ग्रस्त आहे. त्यामुळे हे दोघे चौथ्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी फिल्डिंग साठी देखील आले नव्हते. त्याच टेस्टमध्ये रोहित आणि पूजाराने दुसऱ्या डावामध्ये 153 धावांची भागीदारी केली होती आणि आपल्या संघाला 466 धावांचा डोंगर उभारण्यास मदत केली होती.

रोहित शर्माला झालेल्या दुखापतीवर अजून कोणतीही गोष्ट समोर आली नाही. त्यामुळे त्याची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकले नाही. तसेच या दोन्ही खेळाडूंवर मेडिकल टीमची नजर असून लवकरच त्याबाबत स्पष्ट माहिती मिळेल असे म्हटले जात आहे.
भारत सध्या या मालिकेमध्ये 2-1 ने पुढे आहे. परंतु या दोन प्रमुख खेळाडूंशिवाय पाचव्या टेस्टमध्ये विजय मिळवायला भारताला खूप कठीण जाईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments