आपलं शहर

First Day Ganesh utsav : पाहा; गणेश उत्सवाचा पहिला दिवस कसा होता, मुंबईचं वातावरण बदललं कसं?

सार्वजनिक मंडळांमध्ये जाऊन गणपतीचे मूखदर्शन घेण्यास बंदी असल्यामुळे अनेकजण नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. ऑनलाईन दर्शन घेण्यावरच भक्तांनी समाधान मानले.

First Day Ganesh utsav : कोरोनामुळे अनेक राज्यांमधील सरकारांनी सार्वजनिक उत्सवांवर बंदी घातल्याने महाराष्ट्रातील गणेशोत्सवावरही त्याचा परिणाम दिसून आला. 10 दिवसांच्या गणेश उत्सवाची सुरुवात मुंबईतही अगदी साध्यापद्धतीने झाली, हे नक्की.

सार्वजनिक मंडळांमध्ये जाऊन गणपतीचे मूखदर्शन घेण्यास बंदी असल्यामुळे अनेकजण नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. ऑनलाईन दर्शन घेण्यावरच भक्तांनी समाधान मानले.

Ganesh Chaturthi AP.jpg?w=400&dpr=2

मुंबई पोलिसांनी 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान कलम 144 लागू केल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जमता न येणे किंवा गर्दी करून जल्लोष करण्यावर बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये जल्लोष न करता गणपतीचे आगमन झाल्याचे पाहायला मिळाले.

E 6L GfVcAQlQgc?format=jpg&name=large

कोणत्याही सणापेक्षा लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला अनेकजणांनी जाहीर पाठिंबा दिला होता. घरगुती गणपतीच्या आगमनावेळीही प्रत्येकाने मोठ्या उत्साहात जल्लोष न करता मिरवणूक काढल्याचे चित्र मुंबईत होते.

E 6YV42XsCUO2ag?format=jpg&name=medium

यंदा मुंबईत कुठेही ढोलताशांचा गजर पाहायला मिळाला नाही, की कोणतीही मोठी मिरवणून पाहायला मिळाली. या सर्वांमुळे मुंबईतील 2021 चा गणेसोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने झाल्याचं निदर्षणास आलं.

8299da69a17c05d6470d0fff93b87876640a0

अनेक ठिकाणी गणेशोत्सव जरी साध्या पद्धतीने साजरा केला जात असता, तरी बाजारापेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली, दादरसारख्या अनेक ठिकाणी अशाप्रकारची गर्दी पाहायला मिळत होती, त्यामुळे कोरोना वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments