फेमस

SIDDHIVINAYAK TEMPLE :मुंबईतील 200 वर्षापेक्षा जुने गणपती मंदिर…

SIDDHIVINAYAK TEMPLE : सिद्धिविनायक गणपती मंदिर हे मुंबईचे आराध्य दैवत मानले जाते. प्रामुख्याने हे मंदिर मुंबईच्या प्रभादेवी भागात आहे.

SIDDHIVINAYAK TEMPLE : सिद्धिविनायक गणपती मंदिर हे मुंबईचे आराध्य दैवत मानले जाते. प्रामुख्याने हे मंदिर मुंबईच्या प्रभादेवी भागात आहे. लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी 1801 मध्ये या मंदिराची स्थापना केली होती. साधारण 200 वर्षांपेक्षा जुने हे मंदिर आहे म्हणूनच मुंबईतील सर्वात जुन्या गणपती मंदिरांपैकी हे एक मंदिर मानले जाते.

विसाव्या शतकापासून ते आत्तापर्यंत सिद्धिविनायकाचे मंदिर हे एका छोट्या मंदिरातून आजच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये विकसित झाले आहे. सिद्धिविनायक मंदिराला दरवर्षी सुमारे 100 दशलक्ष ते 150 दशलक्ष रुपयांपर्यंतची देणगी मिळत असते, त्यामुळे ते मुंबईसह देशातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते.

सिद्धिविनायकाचे मंदिर 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधण्यात आले होते. लक्ष्मण विठू या ठेकेदाराने हे मंदिर बांधले आहे. या मंदिराचे बांधकाम करण्याकरिता देऊबाई पाटील नावाच्या श्रीमंत आगरी स्त्रीने निधी पुरवला होता. आपत्यहिन आसल्यामुळे आपल्याकडे असलेला सर्व पैसा देऊबाईंनी या मंदिरावर खर्च केला, जेणेकरुन गणेशाने इतर वंध्य स्त्रियांना मुले द्यावीत, हा त्या मागचा हेतू होता.

मंदिराची रचना कशी आहे?

मंदिरामध्ये सिद्धी विनायकसाठी एक छोटासा मंडप आहे आणि गर्भगृहाचे लाकडी दरवाजे अष्टविनायकाच्या प्रतिमांनी कोरलेले आहेत, म्हणजेच महाराष्ट्रातील गणेशाचे आठ रूप त्या दरवाजांवर कोरल्याचे दिसून येते. मंदिराचे आतील छप्पर सोन्याने मढवलेले आहे आणि मध्यवर्ती गणेशाची मूर्ती आहे. आसपासच्या परिघामध्ये हनुमानाचे देखील मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील भागात एक घुमट आहे, जो संध्याकाळी अनेक रंगांनी उजळलेला दिसून येतो. श्री गणेशाची मूर्ती अगदी घुमटाखालीच स्थित आहे. गणपतीची मूर्ती ही एका काळ्या पाषाणातून निर्माण केली आहे आणि गणपतीची सोंड ही डाव्या ऐवजी उजव्या बाजूने आहे, अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात.

मंदिराला इतकं महत्त्व का?

सिद्धिविनायक हा भक्तांमध्ये “नवसाचा गणपती” किंवा “नवसाला पावणारा गणपती” म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणूनच विविध पूजा-अर्चा करण्यासाठीची सुविधा प्रशासनाकडून मंदिरात उपलब्ध करून दिल्या आहेत. सामान्य नागरिकांपासून अनेक राजकारणी नेते, मंत्री, मोठे व्यापारी, अभिनेते, अभिनेत्री असे सर्वजण सिद्धिवनायकाच्या चरणी लोटांगण घालतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments