फेमस

Sidharth shukla : मनोरंजन क्षेत्रातील उमदार चेहरा, सिद्धार्थ शुक्ला कसा झाला फेमस?

वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

Sidharth shukla : बिग बॉस 13चा विजेता ( big boss 13) सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्याला सकाळी रूग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले.सध्या त्याचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये ( kupoorv)असून पंचनाम्यासाठी दाखल केला आहे.अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमॉर्टम अहवाल प्रतीक्षेत असून त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट घेण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.निधनामुळे सिरअल विश्वात शोककळा पसरली आहे.

सिद्धार्थ शुक्ला टीव्ही जगतात सुप्रसिद्ध नाव होते आणि सोशल मीडियावर खूप चर्चेत होता . इन्स्टाग्रामवर नवनवीन फोटो व्हिडिओ नेहमीच शेअर करायचा.सिद्धार्थ शुक्लाने 24 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. त्याने कॅप्शनमध्ये सर्व कर्मचारीचे आभार मानले आहेत.(instagram post )

1980 रोजी जन्मलेला सिद्धार्थ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत राहण्यास आला होता. त्याने कारकीर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. यानंतर त्यांना “बाबुल का आंगन छोटे ना” या टेलिव्हिजन शोमध्ये मुख्य भूमिका मिळाली. “बालिका वधू” नया मालिकेने तो घरोघरी प्रसिद्ध झाला .त्यानंतर ‘खतरो के खिलाडी’मध्ये देखील त्याने विजय मिळवले. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने ‘बिग बॉस 13’ सिझन आपल्या नावावर केल होतं.Balika Vadhu ,khatroke khiladi )

संपूर्ण मनोरंजन विश्वासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे.कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तो त्याच्या मागे कुटुंबात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments