आपलं शहर

Skywalk : मुंबईमधील स्कायवॉक नेमके कुणासाठी, कसा होतोय त्यांचा वापर?

स्कायवॉक हे नागरिकांसाठी की समाजकंटकांसाठी असा प्रश्न देखील येथे उपस्थित होतो.

Skywalk :शहरात अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या स्कायवॉकच्या उपयुक्ततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर बहुतेक स्कायवॉक हे  टपोटीगिरीचे अड्डेही बनले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी स्कायवॉक प्रकल्पांना स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांनी विरोध दर्शवला आहे.स्कायवॉक हे नागरिकांसाठी की समाजकंटकांसाठी असा प्रश्न देखील येथे उपस्थित होतो.Who exactly is the Skywalk in Mumbai for, and how is it used?

राज्याचे मंत्रिमंडळ व पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून स्कायवॉकच्या कामांचा आढावा घेण्याचे आवाहन केले आहे.अस्लम शेख म्हणाले की, स्कायवॉक योजनेत जनतेचा पैसा वाया गेला आहे. आयआयटी बॉम्बे किंवा व्हीजेटीआयचे प्राध्यापक आणि एक अतिरिक्त मुख्य सचिव (शहरी विकास) यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष पॅनल नेमून स्कायवॉकच्या गरजेचा आढावा घेतला पाहिजे.

MMRDA ने शहरांमध्ये 23 स्कायवॉक बांधल्याची माहिती दिली असून स्कायवॉक बांधकामावर सुमारे 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.तसेच स्कायवॉकच्या वार्षिक देखभालासाठी सुमारे 2.5 कोटी रुपये हे खर्च केले जातात.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पालकमंत्री शेख म्हणाले की, स्कायवॉकची व्यवहार्यता आयआयटी-बॉम्बे किंवा व्हीजेटीआयने अभ्यासली पाहिजे. शहराला खरोखरच स्कायवॉकची गरज आहे का याचा BMC व MMRDA कडून आढावा घेतला पाहिजे. कोट्यवधी रुपये खर्च करून बोरिवलीत बांधण्यात आलेला स्कायवॉकचा वापरही मोठ्याप्रमाणात होत नसल्याचे या पत्रात सांगण्यात आले. मुंबईत ही बांधण्यात आलेले अनेक स्कायवॉकही खूप कमी प्रमाणात वापरले जातात.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की रहिवासी आणि दुकानदारांच्या निषेधानंतर, उपनगरीय पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच मालाड (ई) मधील पोद्दार रोडवर स्कायवॉक बांधण्याच्या BMC च्या योजनेला देखील रोखले होते. यापूर्वी बोरिवली (ई) मधील 91 कोटी रुपयांच्या स्कायवॉक योजनेलाही विरोध करण्यात आला होता.

 

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments