स्पोर्ट

T20 world cup india squad : T20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ सज्ज..पंधरा खेळाडूंचा संघ जाहीर..तीन खेळाडू असणार राखीव

T20 world cup india squad : काही नाव बघून तुम्हीदेखील वाटेल आश्चर्य...

T20 world cup india squad : T20 वर्ल्डकप सुरु होण्याची तारीख आता हळूहळू जवळ येत आहे. त्यामुळे सगळ्या क्रिकेट बोर्ड्स कडून त्यांच्या खेळाडूंचा संघ जाहीर होत आहे. त्यातच आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने ( BCCI ) देखील 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये विराट कोहली कर्णधार आणि रोहित शर्मा उपकर्णधाराची जागा सांभाळतील. तसेच विराट कोहली पाहिल्यांदाच T20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करेल. सगळ्यात चकित करणारी बाब अशी की, या संघामध्ये रवीचंद्रन अश्विनचा देखील समावेश आहे. वरूण चक्रवर्ती आणि अक्सर पटेल यांचा देखील यामध्ये सामावेश असेल. तेच शार्दूल ठाकूर, दीपक चहर आणि श्रेयस अय्यर यांना राखीव खेळाडू (Standby Player) म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

असा आहे भारतीय संघ : विराट कोहली, के एल राहुल, रोहित शर्मा, सूर्याकुमार यादव, ईशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेशवर कुमार.

Standby Players : श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर.

पाकिस्तान सोबत होणार पहिला सामना :

T20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पाहिलाच सामना हा पाकिस्तान सोबत असणार आहे. कारण हे दोन्ही संघ एकाच ग्रुप B मध्ये आहेत. मागील वेळेस 2007 च्या T20 वर्ल्डकपमध्ये असे झाले होते, जेव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही एकाच ग्रुपमध्ये होते. तसेच या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, न्यूझीलँड देखील आहेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments