फेमस

Taraporewala Aquarium : समुद्रातील सगळ्या प्रजातींचं एकत्र दर्शन, भेट द्या मरिनच्या तारापोरवाला मत्स्यालयाला…

मरीन ड्राईव्हला फेरफटका मारताना समोरच एक खुप उंच इमारत दिसते, ती म्हणजे मुंबई शहरातील एकमेव तारापोरवाला मत्स्यालय.

Taraporewala Aquarium : मुंबईत तुम्ही अनेक समुद्री चौपाटींना भेटी दिल्या असतील; पण तुम्ही समुद्राच्या आतील जग पाहिले नसेल, पण जर तुम्हाला अनेक माशांबद्दल जाणून घ्याच असेल, तर मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेले मुंबईचे तारापोरवाला मत्स्यालय. मरीन ड्राईव्हला फेरफटका मारताना समोरच एक खुप उंच इमारत दिसते, ती म्हणजे मुंबई शहरातील एकमेव तारापोरवाला मत्स्यालय.(To see all the species in the sea together, visit the Taraporewala Aquarium of the Marines)

सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे, अशी संकल्पना प्रथम 1923 साली बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री. मिलार्ड यांनी मांडली. त्याचबरोबर समुद्राच्या आतील अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळावे, या हेतूने मरीन ड्राईव्हला 60 वर्षांपूर्वी म्हणजे 1951 साली बांधण्यात आलेले हे मत्स्यालय आहे.

मत्स्यालयाच्या बांधणीसाठी त्यावेळी 8 लाख रुपये खर्च झाला, त्यापैकी दोन लाखांचा निधी तारापोरवाला यांनी दिला होता. असे हे दुमजली मत्स्यालय 108 फुट लांब व 94 फुट रुंद असून या इमारतीच्या उभारणीसाठी तीन वर्ष लागली होते. मत्स्यालयात प्रवेश केल्यानंतर समुद्रातील व तलावातील वेगवेगळ्या प्रकारचे मासे नजरेस पडतात. या मत्स्यालयात 100 हून अधिक मासे असून आजही येथे 72 प्रजातीचे मासे व गोड्या पाण्यातील 100 प्रकारच्या प्रजाती आहेत.

या मत्स्यालयातील विशेष आकर्षण म्हणजे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे इथे पाहायला मिळतील. तसेच ‘स्टिंग रे’, ‘शार्क’ किवा ‘काळा मासा’, ‘कासवे’ असे डिस्कव्हरीवर पाहायला मिळणारे समुद्री जीव समोर पाहताना मनाला फार आनंद मिळतो. त्याचबरोबर माशांच्या टँकवर लिहिलेले नाव आणि त्याबद्दलची दोन ओळीतील माहितीही मत्स्यालयात फेरफटका मारताना सर्वात महत्वाची गोष्ट वाटते.

इमारतीत तळमजल्यावर मत्स्यालय आणि दुसऱ्या मजला मत्स्यव्यवसाय विभागाच्या मुख्यालयाकरिता आहे. अशा या समुद्री सफर घडवणाऱ्या मत्स्याल्याला भेट देण्याकरिता तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावरून चालत किंवा टक्सीने जाऊ शकता.

हे मत्स्यालय पर्यटकांसाठी मंगळवार ते शनिवारी खुले असते, याला भेट देण्याची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंतची आहे. विशेषतः रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना हे मत्स्यालय खुले करून दिले जाते व वेळ ही सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत वाढवली जाते. या मत्सल्यात जाण्यासाठी लहानमुलांसाठी (६ ते १६ वर्षाच्या आत) 10 रुपये प्रवेश फी आकारली जाते, तर प्रौढांसाठी 15 रुपये प्रवेश फी आकारली जाते.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments