दहशतवादी मुंबईत; पण टीप दिल्ली पोलिसांना कशी? काय आहे कारण… | Terrorist in Mumbai
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी दाऊदच्या टोळीतील सहा जणांना दहशतवादी कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Terrorist in Mumbai | दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी दाऊदच्या टोळीतील सहा जणांना दहशतवादी कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यामध्ये जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाचंही नाव आहे. जान शेख हा मुंबईचा रहिवासी आहे आणि संपूर्ण टोळीचा कॅप्टन आहे, अशी माहिती आता समोर आली आहे, मात्र एक प्रश्न आता समोर येत आहे, तो म्हणजे आयबीने (Intelligence Bureau) ने ही माहिती मुंबई पोलिसांना देण्याआधी दिल्ली पोलिसांना का दिली? (Terrorists in Mumbai, But how to tip Delhi Police, what is resion)
मुंबई पोलिसांना पत्ता नाही?
जान शेखच्या अटकेपर्यंत ही माहिती मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिसांना माहितही नव्हती. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी स्पष्ट केले की समीर कालियाला मुंबईतून अटक करण्यात आलेली नाही, तर राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी करण्यासाठी एटीएसचे पथकही बुधवारी दिल्लीला रवाना झाले आहे.
कोण आहे समीर कालिया?
समीर कालिया उर्फ जान शेखची 20 वर्षांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तो दाऊद टोळीशी संबंधित होता, त्यामुळे तो आमच्या रडारवर होता, पण दहशतवादाशी संबंधित ताज्या प्रकरणात केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांशी माहिती शेअर केली, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी समीर कालियाला त्याच्या इतर साथीदारांसह अटक केल्याची माहिती विनीत अग्रवाल यांनी दिली आहे.
समीर कालिया हा मूळचा धारावीचा
समीर कालिया उर्फ जान शेख हा मूळचा मुंबईतील धारावीचा रहिवासी असला तरी, महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी काढलेल्या इनपुटमध्ये समीर आणि त्याच्या साथीदारांच्या वतीने मुंबई शहरातील कोणत्याही प्रकारची माहिती उघड होत नाही. महाराष्ट्र एटीएसने बुधवारी त्याच्या घराची झडती घेतली आणि त्याच्या कुटुंबाची चौकशीही केली. समीर कालियाच्या ठिकाणाहून कोणतेही स्फोटक किंवा शस्त्रे जप्त केली नसल्याची माहिती विनीत अग्रवाल यांनी दिली आहे.
9 सप्टेंबर रोजी दिल्लीला जाणार होता
अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार समीर कालिया हा 9 सप्टेंबर रोजी दिल्लीला जाणार होता. पण त्याचे तिकीट कन्फर्म झाले नाही. नंतर त्याने 13 सप्टेंबरच्या वेटिंग यादीतील सुवर्ण मंदिर ट्रेनचे तिकीट बुक केले. जेव्हा ट्रेन कोटा येथे पोहोचली, तेव्हा त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली
समीर कालियाच्या अटकेनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीची बैठक बोलावली होती. अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र एटीएस प्रमुख आणि मुंबई पोलीस आयुक्तांची या बैठकीत उपस्थिती होती.
#Terrorists
Delhi Police arrested 6 Muslim Terrorists from Delhi, Maharashtra & UP that were planning to carry out multiple bomb blasts during upcoming Hindu festivals.#Terrorists ↓
-Jan Mohammed Ali Shaikh
-Mohd. Abu Bakar
-Zeeshan Qamar
-Amir Javed
-Osama
-Moolchand pic.twitter.com/vjGNyDPCWl— Free (@FreeFda) September 15, 2021