फेमस

Love Story of Javed : ब्रेकअप करायला भेटले आणि प्रेम अजून वाढलं, हजारोंची धडकन होती जावेदांच्या प्रेमात

शबाना आझमी ही 1970 च्या काळातील सर्वात फेमस अभिनेत्री. तिच्या दिलखेचक अदांमुळे तिच्यावर हजारो जण आपला जीव ओवाळून टाकत असतं.

Love Story of Javed : आज शबाना आझमी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. (The Love Story Of Javed Akhtar Shabana Azmi)

शबाना आझमी ही 1970 च्या काळातील सर्वात फेमस अभिनेत्री. तिच्या दिलखेचक अदांमुळे तिच्यावर हजारो जण आपला जीव ओवाळून टाकत असतं. हे जरी खरं असलं तरी शबाना आझमीचा रिअल हिरो वेगळाच होता.

shabana and javed2.jpg?w=900&dpr=1

जावेद अख्तर. नाम तो सुनाही होगा. 76 वर्षांचे प्रसिद्ध कवी, गीतकार, पटकथा लेखक आणि राजकारणातही काही प्रमाणात सक्रिय असलेले. एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत दबदबा निर्माण करण्याचं काम यांनी केलं होतं. हे मूळचे ग्वाल्हेर भागातील. पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार तसेच पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांनी पटकावलेत. हजारो तरुणींच्या हृदयावर यांनी राज्य केलं होतं. मात्र यांच्या हृदयावर एकाच अभिनेत्रीने छाप पाडली होती. ती म्हणजे शबाना आझमी.

shabana and javed5 1.jpg?w=900&dpr=1

जावेद अख्तर यांचं हनी इरानीसोबत आधीच लग्न झालं होतं. मात्र शबानाच्या सौंदर्यापुढे जावेद अख्तरांनीही शरनागती पत्करली होती. जावेद अख्तर नेहमी कैफी आझमी यांच्या घरी भेटायला जात असतं. त्याचवेळी त्यांची भेट शबानाशी होत होती. मात्र या काळात शबानाने जावेद यांना इग्नोर करायला सुरुवात केली. कारण फक्त एवढच होतं की जावेद यांचं लग्न झालं होतं.

लग्न जरी झालं असलं तरी कामाच्या निमित्ताने जावेद आणि शबाना यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. त्यांच्या रिलेशनच्या गोष्टी मीडियाने फ्रंटपेजला छापायला सुरुवात केल्या. एकमेकांना डेट करत असलेल्या बातम्या हेडिंग बनत गेल्या आणि याचा परिणाम खूप वाईट झाला.

shabana and javed4.jpg?w=900&dpr=1

समाजात होणारी चर्चा पाहून शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला होता. एक शेवटची भेट घ्यायची, त्यामध्ये दोघांनी संमतीने आपलं नातं थांबवण्याचा आणि जावेदांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला होता. दोघांची भेटण्याची वेळ ठरली, त्यावेळी ते एका हॉटेलमध्ये भेटले होते. दोघांचे बोलणेही सुरु झाले मात्र त्यांचे बोलणे इतके चालले की या बोलण्यात ते ब्रेकअप करण्याचं विसरुन गेले आणि आपलं नातं तसच पुढे सुरु ठेवलं.

अखेर 1978 साली जावेद अख्तर आणि हनी इरानी यांचं लग्न मोडलं. दोघांनी संमतीने घटस्फोट घेतला. तिथून पुढे सुरु झाली जावेदांची प्रेम कहाणी. लग्नाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर पुन्हा जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. अखेर 6 वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि दोघे एकमेकांच्या नात्यात गुंतून गेले.

shabana and javed3.jpg?w=900&dpr=1

आजही जावेद अख्तर आपल्याला कवी, गीतकार, पटकथा लेखनामध्ये येवढे तरबेज आहेत की ते एका तरुण उमदार कलाकारालाही मागे टाकतील, तर दुसरीकडे शबाना आझमीही इतक्या धाकड अॅक्टिंग करतात की एका नवख्या अभिनेत्रीही त्यांच्यासमोर फिक्या पडतील.

तर कशी वाटली तुम्हाला आजची लव्हस्टोरी आम्हाला नक्की कळवा आणि अशाच वंटास स्टोरी वाचण्यासाठी Vantas Mumbai ला फॉलो करा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments