खूप काही

upsc exam results : UPSC च्या नागरी सेवा परीक्षेत शुभम कुमार ठरले अव्वल;पहा त्यांचा खडतर प्रवास…

UPSC च्या विविध सेवांमध्ये 761 उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती.त्यापैकी Upsc मध्ये 13 पुरुष व 12 महिला असे एकूण 25 उमेदवार अव्वल आले आहेत.

upsc exam results :(UPSC)केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरीसेवा परीक्षा2020 चा निकाल हा 24 सप्टेंबर 2021 ला जाहीर करण्यात आला आहे.UPSC च्या विविध सेवांमध्ये 761 उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती.त्यापैकी Upsc मध्ये 13 पुरुष व 12 महिला असे एकूण 25 उमेदवार अव्वल आले आहेत. या 25 उमेदवारांकडे देशातील काही मान्यताप्राप्त संस्थांकडून अभियांत्रिकी, मानविकी, वाणिज्य व वैद्यकशास्त्रातील शैक्षणिक पात्रता आहे.(Shubham Kumar tops UPSC’s civil service exam; see his tough journey…)

UPSC च्या नागरी सेवा परीक्षेत उमेदवारांच्या यादीत अखिल भारतीय रँक (AIR)1 मिळवत शुभम कुमारने देशात अव्वल स्थान मिळवले आहे. शुभम कुमार हा बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील राहणारा आहे. शुभम कुमार यांनी UPSC च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, त्यांनी आपला पर्यायी विषय म्हणून मानववंशशास्त्रात पात्रता मिळवली आहे.

शुभम कुमार हा त्याच्या शिक्षणासाठी मुंबईत आला होता. तो मुंबईचा आयआयटीचा माजी विद्यार्थी ही आहे.त्याने आयआयटी बॉम्बे चे शिक्षण हे मुंबई मधून पूर्ण केले आहे. तसेच शुभमने IIT बॉम्बेमधून सिव्हिल इंजिनिअरिंग च्या अभ्यास क्रमामधून बीटेक केले आहे.व बीटेक ची पदवी ही प्राप्त केली आहे.

शुभम कुमार हे अमेरिकेमध्ये संशोधक म्हणून काम करत होते,परंतु upsc नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी ती नोकरी सोडली होती.तसेच कुमार म्हणाले की यूएसए मध्ये केलेल्या संशोधनाच्या अनुभवानंतर वाटते की भारतात खूप कमी प्रमाणात विकास झाला आहे. शुभम यांना राष्ट्राच्या व ग्रामीण भारताच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा आहे. शुभम कुमारचे वडील एका बँकेत नोकरी करतात.

शुभम कुमार यांनी नागरी सेवा परीक्षेमध्ये या आधीही प्रयत्न केला होता.2019 मध्ये त्यांनी या परीक्षेत यशही मिळवले होते.परंतु त्यांनी त्या वेळी upsc च्या यादीत 290 वा क्रमांक मिळवला होता. 2019 मध्येही त्यांनी पर्यायी विषय म्हणून मानववंशशास्त्र निवडले होते. 2018 मध्ये देखील त्यांनी प्रयत्न केला होता, पण ते त्या वेळी परिक्षेत अणुऊतीर्ण झाले होते.

भोपाळमधील जागृती अवस्थी हिने या परीक्षेत रँक 2 मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे.तीने ही इंजिनिअरिंग केली आहे. 24 वर्षीय,जागृती अवस्थी ही महिलांमध्ये अव्वल आली आहे. नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षेसाठी 4 ऑक्टोबर 2020 मध्ये सुमारे 4.82 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी हजेरी लावली होती, त्यापैकी 10,564 उमेदवार जानेवारीमध्ये झालेल्या लेखी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरले होते.

 

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments