Uncategorized

VACCINATION UPDATES : पहिल्यांदाच ग्रामीण भागातील महीलांनी दिला कोरोना लसीकरण मोहिमेला प्रतिसाद…

VACCINATION UPDATES : भारतात 8 महिन्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहिमेत पहिल्यांदाच ग्रामीण लोकसंख्येसाठी लसीचे न्याय वितरण प्रथमच नोंदवले गेले आहे.

VACCINATION UPDATES : भारतात 8 महिन्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहिमेत पहिल्यांदाच ग्रामीण लोकसंख्येसाठी लसीचे न्याय वितरण प्रथमच नोंदवले गेले आहे. 31 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर पर्यंत सुरू असलेल्या मेगा आठवड्यात लसीकरण मोहिमेदरम्यान 967 महिलांनी दर 1000 पुरुषांमागे कोरोना लस घेतली.

डॉक्टर सचिन पांडे एक भौतिक शास्त्रज्ञ आसून त्यांनी ‘कोविड टीका’ या ॲपद्वारे भारतातील लसीकरणाचे विश्लेषण करताना माहिती आहे दिली आहे.बीएमसीचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की ‘सेकंड शॉट ओन्ली’ लसीकरण मोहिमेसाठी नागरिकांचा प्रतिसाद चांगला होता आणि ‘महिलादिन’ यासाठी मदत करू शकतो.

डॉक्टर पांडे यांनी सांगितले की, जर आपल्या देश जवळपास कोटी दैनंदिन लसीकरण मोहिम सांभाळू शकत असेल तर ऑक्टोबर पर्यंत भारतातील 80% लोकांना कमीत कमी एकदातरी लस दिली जाऊ शकते.

कोविड लसीकरण बोर्डाची पाहणी केली असता गेल्या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागात झालेल्या लसीकरण संख्येमध्ये वाढ दर्शवतो. शहरी भागात 31.9 लाखांच्या तुलनेत 31 ऑगस्ट रोजी ग्रामीण भारतामध्ये 1.19 कोटी डोस हे ग्रामीण भागात देण्यात आले आहे.

ग्रामीण भागामध्ये जिथे 65% लोकसंख्या राहते आतापर्यंत 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 4.082 कोटी कोविड डोसपैकी एकूण 69.81% डोस हे फक्त ग्रामीण भागातच देण्यात आले आहे.

मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी लस घेणे धोक्याचे आहे अशी गैरसमज निर्माण झाली होती, त्यामुळे महिलांचे लस घेण्याचे प्रमाण कमी होताना चे दिसून आले होते या बाबीत डॉक्टर्स ने माहिती दिली असता जूनमध्ये लसीकरण पुन्हा सुरू झाल्यानंतर महिलांचे आणि विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचे लस घेण्याचे प्रमाण वाढू लागले.

तरीही, सध्या मोठ्या शहरांमध्ये लोकांना लसीकरणाबाबत सल्ला देणे आवश्यक आवश्यक आहे आणि विशेषतः ‘ दुसरा शॉट’ या लसीकरण मोहिमेची जनजागृती करणे गरजेचे आहे जेणेकरून संख्या सुधारेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments