फेमस

अमित ठाकरेंचा व्हायरल फोटो, तुम्हीही म्हणाल; माणूस असावा तर असा… | Amit Thackeray

मनसे नेते अमित ठाकरे यांच्याबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकत आलोय. त्यांच्या वागण्याबद्दल, बोलण्याबद्दल, खेळाबद्दल आणि अनेक गोष्टींबद्दल.

Amit Thackeray | मनसे नेते अमित ठाकरे यांच्याबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकत आलोय. त्यांच्या वागण्याबद्दल, बोलण्याबद्दल, खेळाबद्दल आणि अनेक गोष्टींबद्दल. राजकारणात कमी असली तरी तरुणांच्या घोळक्यात त्यांची चर्चा नेहमीच होत असते. अशाच एका फोटोने अमित ठाकरे पुन्हा चर्चेत आले आहेत.

अमित ठाकरे यांचा साधेपणा दाखवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत, नेमकं काय आहे फोटोत आधी तुम्ही निरखून पाहा.

Amit Thackeray
Amit Thackeray

(हा फोटो कुठला आहे, याची माहिती वंटास टीम शोधत आहे, तुम्हाला या फोटोचं लोकेशन माहित असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा) अमित ठाकरे यांचा साधेपणा दाखवणारा हा फोटो सध्या प्रत्येक मनसैनिकाच्या फोनमध्ये आहे हे नक्की. फोटो व्हायरल होत असताना त्याच्यासोबत काही शब्दही व्हायरल होत आहेत, ते म्हणजे…

“बाप सरपंच असला तरी पोर बोलतं, हवा फक्त आपलीच! इथे तर ह्या पोराच्या समोर जे नाव आहे, त्या नावाने चांगले चांगले घायाळ होतात, तरी नम्रता बघा किती आहे, फक्त नेता असून चालत नाही. उद्याचा नेता हा सामान्य जनतेतून घडत असतो, कोणताही गर्व न बाळगता हा 1 दिवस महाराष्ट्राचं भविष्य नक्कि बदलेल”

अशा कॅप्शनखाली हा फोटो व्हायरल होत आहे.

सध्या नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे, निवडणुका कधी होणार हे जरी निश्चित झालं नसलं तरी सर्व पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी मनसेही मोठ्या तयारीने मैदानात उतरली आहे.

मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत अमित ठाकरे हेदेखील निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी दौऱ्यांना निघाले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधणे असो वा अनेक प्रभागातील नेत्यांची निवड करणे असो, अत्यंत साधेपणाने कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा नेता म्हणून अमित ठाकरे यांची कार्यकर्त्यांमध्ये ओळख आहे, त्यामुळे येत्या काळात अनेक कार्यकर्त्यांना जुळवून ठेवणारा नेता, म्हणून मनसैनिकांमध्ये चर्चा सुरु असताना दिसतात.

सध्या व्हायरल होणारा फोटोदेखील असंच काहीचं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वडिलांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही, अशावेळी वडिलांकडे सगळी जनता आकर्षित असताना आपण मात्र नम्रपणे ते सगळं दृष्य पाहात राहायचं, इतका नम्रपणा या फोटोमध्ये आमित ठाकरे यांचा दिसून येतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments