स्पोर्ट

Virat Kohli : आगामी T20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली देणार कर्णधारपदाचा राजिनामा..

Virat kohli : विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाचे कर्णधारपद लवकरच सोडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Virat Kohli : विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाचे कर्णधारपद लवकरच सोडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या T20 वर्ल्डकपनंतर विराट त्याच्या कर्णधारपदाचा राजिनामा देणार आहे. याची माहिती त्याने स्वतःच सोशल मीडियावरून दिली आहे. त्याने म्हटले आहे की तो येत्या T20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा कर्णधार नसेल. तसेच कर्णधार म्हणून हा वर्ल्डकप त्याची शेवटची टूर्नामेंट असेल. परंतु भारताकडून तो पुढे T20 मध्ये खेळत राहणार असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. तसेच एकदिवसीय आणि टेस्ट या दोन्ही फॉरमॅट्समध्ये मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व विराट कोहलीच करेल. मागील काही दिवसांपासून विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याचे वृत्त समोर येत होते परंतु बिसीसीआय ( BCCI )ने याचे खंडण केले होते. बिसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी कर्णधारपदामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले होते.

विराट कोहलीच्या नेतृत्वाामध्ये भारतीय संघाने 45 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये 29 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे, तर फक्त 13 सामने पराभूत होऊन 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. कोहलीच्या नेतृत्वाामध्ये भारतीय संघाची विजायची टक्केवारी 65.11 राहिली आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध सिरीजमध्ये विराट कोहलीला कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. त्याचबरोबर येणारा T20 वर्ल्डकप हा विराट कोहलीसाठी कर्णधार म्हणून पहिला T20 वर्ल्डकप असेल. तसेच T20 क्रिकेटमध्ये देखील विराट कोहलीचे आकडे खूप कमालीचे आहेत. विराटने आतापर्यंत 90 T20 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये 52.61 च्या सरासरीने 3159 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 28 अर्धशतकांचा देखील सामावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments