क्राईम

Sachin Waze case : वाझेचा कारनामा, 6 पाणी जबाब पत्रात काय म्हणाला सचिन वाझे, वाचा धक्कादायक माहिती

100 कोटी वसुली प्रकरणात अटक झालेल्या मुंबई पोलीसमधील माजी एपीआय सचिन वाझेने आपला जबाब नोंदवला आहे.

Sachin Waze case : 100 कोटी वसुली प्रकरणात अटक झालेल्या मुंबई पोलीसमधील माजी एपीआय सचिन वाझेने आपला जबाब नोंदवला आहे. अंमलबजावणी संचालनालयाला (ED) दिलेल्या निवेदनात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. देशमुख यांच्या सांगण्यावरून वसुली केल्याचे वाझेने आपल्या पत्रात म्हटलं आहे. तो वसूल करत असलेल्या रक्कमेतील कोणतीच रक्कम आपण स्वत:च्या खर्चासाठी वापरली नसल्याचे वाझेने स्वत:च्या पत्रात म्हटलं आहे. (What is the update in Sachin Waze case, what did Waze say in his reply)

सचिन वाझे काय म्हणाला…

‘मला कोणताही आर्थिक लाभ मिळाला नाही. ऑर्केस्ट्रा किंवा बारमधून मी जी काही रक्कम गोळा केली होती, ती कुंदन शिंदे यांना देण्यात आली. ‘नोकरी पूर्ववत झाल्यानंतर माझ्यावर नोकरी वाचवण्यासाठी राजकीय दबाव होता, ज्यामुळे मी हे काम अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार केले.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांना अनिल देशमुखांनी दिलेल्या आदेशांबद्दल कळवले होते, त्यांनी तो आदेश न पाळण्याचे आदेशही दिले होते, मात्र त्या आदेशांचे पालन न करता मी पैसे घेत राहिलो. देशमुख यांच्या सूचनेवरून मी ऑर्केस्ट्रा बारमधून पैसे गोळा करत असल्याचे परमबीर सिंग यांना माहित नव्हते. अंमलबजावणीचे डीसीपी डॉ.राजू भुजबळ आणि समाजसेवा शाखेचे एसीपी संजय पाटील यांना याची माहिती होती, असे मत वाझेने आपल्या दाव्यात मांडले आहे.

ठरली होती मिटींग

वाझेच्या म्हणण्यानुसार रेस्टॉरंटसह हुक्का लॉजकडूनही वसूली करण्याचे नियोजन करण्यात येत होते, यासंदर्भात फेब्रुवारी 2021 मध्ये अनिल देशमुखांच्या ध्यानेश्वरी बंगल्यावर ही मिटींग बोलवण्यात आली होती, या मिटींगमध्ये अनिल देशमुखांचा मुलगा सलिल देशमुख, ट्राम ट्रंकचे मालक अंकित आनंदही उपस्थिती होते. कवेक्शन सिस्टिम कशी असेल, या संदर्भात या मिटींगमध्ये चर्चा होणार होती, मात्र त्याआधीच सचिन वाझेला अटक करण्यात आली होती.

Antilia Case: मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात 9 मिनिट मीटिंग झाली होती, सीसीटीवी द्वारे खुलासा

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments