राजकारण

Anil Parab : राणेंना हरवणारे, कायद्याने लढणारे सायलेंट वर्कर अनिल परब इतके फायर का?

नारायण राणेंना हरवणारे नेते म्हणून अनिल परब यांची वेगळी ओळख निर्माण झाली.

Anil Parab : दिवंगत बाळा सावंत हे कट्टर शिवसैनिक, सेनेचे विश्वासू शिलेदार आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सावंतांची जागा होती. वांद्रे पूर्व मतदारसंघात राजकारणापलिकडे त्यांची वेगळी ओळख होती, मात्र 2015 मध्ये त्यांचं निधन झालं आणि याच मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली, यावेळी शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्या, तर त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणे यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारले. यावेळी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते अनिल परब यांच्या रणनितीमुळे तृप्ती सावंत तब्बल 20 हजारांच्या मतधिक्क्याने जिंकून आल्या, तेव्हापासून नारायण राणेंना हरवणारे नेते म्हणून अनिल परब यांची वेगळी ओळख निर्माण झाली, फक्त इतकच नाही, तर त्यांच्या फायर ब्रँड नेतृत्त्वाचा प्रवास नेमका कसा सुरु झाला, हेच आपण आज पाहणार आहोत.

एखाद्या आमदाराला निवडूण आणणे म्हणजे त्याच्या मतदारसंघातील प्रत्येक विभाग, प्रत्येक कॉलनी आणि प्रत्येक बूथचं योग्य नियोजन करणे इतपासून अनिल परब तयारीला लागतात. संपूर्ण कार्यकर्त्यांचा समन्वय करुन मोठा विजय मिळवणे, हे अनिल परब यांच्या यशाचं गमक आहे.

sddefault

20 वर्षांपासून कधीही भगवा न फडकलेल्या अंधेरीतील चांदिवली विधानसभा मतदार संघात अनिल परब यांनी भगवा फडकवला. शिवसेनेचे विधानपरिषदेवरील आमदार म्हणून अनिल परब यांची खास ओळख होती, पक्षाने दिलेली विधानपरिषदेतील गटनेतेपदाची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या अनिल परब यांना विधानसभेची जबाबदारी दिली आणि त्यांनी ती यशस्वी करून दाखवली.

20 वर्षांपूर्वीची गोष्ट

बिकॉमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजसेवेमध्ये रस असलेल्या अनिल दत्तात्रय परब यांनी वकिलीचे शिक्षण घ्यायचं ठरवलं. त्या काळात बाळासाहेब ठाकरे हे अनेक तरुणांचे आयडॉल होते, बाळासाहेबांचा एक शब्द म्हणजे लाखो तरुणांसाठी शेवटचा शब्द ठरत असे, त्याच तरुणांपैकी एक म्हणजे अनिल परब. वकिलीचे शिक्षण घेताना सार्वजनिक उत्सवांचे आयोजन, गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, आरोग्य तपासण्या घडवून आणणे, सामान्यांना कायदे विषयक मोफत सल्ले देणे अशा गोष्टी अनिल परब सुरुवातीच्या काळात करत असत.

anil 2

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार दिवंगत मधुकर सरपोतदार यांच्या निदर्शनास अनिल परब यांची सर्व कामं येऊ लागली आणि तिथून शिवसैनिक अनिल परबांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 2001 पासून बांद्रा ते अंधेरी या विभागाचा प्रमुख म्हणून अनिल परब चोख जबाबदारी पार पाडत आहेत. थेट लोकांमध्ये मिसळणं, कार्यकर्त्यांचे संघटन, कार्यकर्त्यांच्या अनेक कायद्याच्या बाजू सांभाळणं, या सगळ्या कामांना अनिल परब यांनी सुरुवात केली, या सगळ्याचा फायदा असा झाला की मातोश्रीचे विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं.

केलेल्या कामाचं फळ म्हणून शिवसेनेकडून 2004 साली परबांची विधानपरिषदेवर वर्णी लागली. तिथून पुढे 2004 ते 2010, 2012 ते 2018 असा त्यांचा विधान परिषदेचा प्रवास सुरु झाला. 2019 मध्ये शिवसेना-भाजप यांच्यात युतीची घोषणा झाल्यानंतर तब्बल 20 वर्षे भगवा न फडकलेल्या अंधेरीतील चांदिवली विधानसभा मतदार संघाची जबाबदारी परबांकडे देण्यात आली आणि अनिल परब तिथून निवडूण आले.

EyYpDjgW8AAoCd0

सोबत असलेल्या भाजपने 2017 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची साथ सोडली, मात्र हार मानतील ते अनिल परब कसले? शिवसेनेने पालिकेमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने घेरण्यास सुरुवात केली, मात्र त्याचवेळी अनिल परब यांनी कमान सांभाळली आणि भाजपला जशासतसं कायद्याच्या चौकटीमध्ये उत्तरे देण्यास सुरुवात केली, तेव्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा मागे पाडून परबांनी मराठी माणसाचा मुद्दा समोर आणला आणि शिवसेनेने महापालिका पुन्हा जिंकली.

अनिल परब यांना दिलेली जबाबदारी ते कुठलीही आरडाओरड न करता चोख पार पाडतात, त्यामुळेच शिवसेनेतला सायलेंट वर्कर म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments