राजकारण

Sanjay Raut : सगळ्यांच्या टार्गेटवर संजय राऊत का? शिवसेनेमध्ये इतकं महत्त्व कसं?

दिल्ली असो वा मुंबई; रोज सकाळी एका व्यक्तीची चर्चा होते, ती म्हणजे संजय राऊत आणि त्यांनी लिहलेल्या 'सामना'मधील अग्रलेखाची.

Sanjay Raut : शिवसेनेसोबत कोणी पंगा घेतलेला असो किंवा कोणत्याही निवडणुकीत शिवसनेची भूमिका स्पष्ट करणे असो, फ्रंटलाईनवर असतात ते म्हणजे शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत. दिल्ली असो वा मुंबई; रोज सकाळी एका व्यक्तीची चर्चा होते, ती म्हणजे संजय राऊत आणि त्यांनी लिहलेल्या ‘सामना’मधील अग्रलेखाची. सामनातून जे छापून आलेलं आहे, त्यानुसार त्या दिवसाचं राजकारण चालतं, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. विरोधकांच्या टार्गेटवरही अनेकदा संजय राऊत असतात, हे नक्की, मात्र त्यांना सेनेमध्ये इतकं महत्त्व कसं, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. (Who is Sanjay Raut, why he target of opponents, Why Sanjay Raut so important in Shiv Sena?)

sanjay raut with balasaheb thackeray
sanjay raut with balasaheb thackeray

संजय राऊत यांनी आतापर्यंत कधीच निवडणूक लढली नाही. शिवसेनेच्या वतीने त्यांनी आतापर्यंत राज्यसभेत खासदारकीची भूमिका निभावली आहे. शिवसेनेचं केंद्रात अढळ स्थान त्यांनी निर्माण केलं आहे आणि राखून ठेवलं आहे. शिवसेनेच्या तिन्ही पिढ्यांमध्ये काम करणारे नेते म्हणून संजय राऊत यांची खास ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा तिन्ही पिढ्यांसोबत संमीश्र अशी कार्यपद्धती ते निभावत असतात.

2019 मध्ये निर्माण झालेलं राजकीय वादळ, जर कोणत्या कारणाने निर्माण झालं असेल तर ते म्हणजे संजय राऊत. सातत्याने होणाऱ्या पत्रकार परिषदा, शिवसेनेचाचं मुख्यमंत्री, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत होणाऱ्या चर्चा हेच मुख्य कारण आहे, राजकीय वादळामध्ये संजय राऊत मेन स्ट्रीममध्ये येण्याचं.

इतिहास काय सांगतो?

समाजामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची क्रेझ असताना वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून संजय राऊत बी.कॉमची पदवी घेत होते. हजर जबाबीपणा, काम करण्याची ताकद, आरे ला कारे करण्याची वृत्ती असल्याने ते नेहमीच त्यांच्या मित्र परिवरामध्ये चर्चेचा विषय ठरत असत. हाच स्वभाव घेऊन ते पत्रकारितेत आले.

Sanjay Raut history
Sanjay Raut history

संजय राऊत यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागापासून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांना मार्केटिंग विभागात काम करण्याची संधी मिळाली. ते मिळालेल्या पदावर सर्वोत्तम काम करत असत. मात्र इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकासाठी क्राईम रिपोर्टर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. हे करत असताना त्यांची काम करण्याची पद्धत, बातम्या मांडण्याची शैली या सगळ्यामुळे संजय राऊत यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. अनेक सनसनाटी बातम्यांचे वृत्तांकन करण्याची त्यांची धडाडीची वृत्ती त्यांचं जीवन बदलणार होती, हे त्यांना माहीत नव्हतं.

संजय राऊत यांच्या ध्यानी मनीही नव्हतं, मात्र बाळासाहेब ठाकरे यांची नजर संजय राऊत यांच्या कामावर होती, त्यांची काम करण्याची वृत्ती, धडपड, मेहनती, बातमी मांडण्याची शैली, सूत्रांकडून योग्य प्रकारे माहिती काढणे, बातमीचा शोध घेणे अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांना ‘दैनिक सामना’ची ऑफर दिली. 1989 ला सामना सुरु झाला आणि 1993 पासून कार्यकारी संपादकाची धुरा संजय राऊत यांनी यशस्वीपणे हाताळली.

Balasaheb Thackeray Sanjay Raut

सामनामध्ये येताच संजय राऊत यांनी ठाकरी शैलीमध्ये लिखानाला सुरुवात केली. बाळासाहेबांना नेमकं काय बोलायचं आहे, हे ते लवकर ओळखत आणि त्यानुसार सामनातील लिखान करत, त्यामुळे सध्याच्या राजकीय विषयांवरदेखील चक्क बाळासाहेबांच्या विचारांप्रमाणेच सामनातील अग्रलेख वाचायला मिळतात.

20050909004711301jpg

2005 मध्ये शिवसेना आणि राज ठाकरे वेगळे झाले. राज ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये सांभाळत असलेल्या पदांचा राजीनामा दिला, मात्र ते राजीनामा पत्रही संजय राऊत यांनी लिहले होते. बाळासाहेबांच्या हातात जेव्हा राज ठाकरे यांच्या राजीनाम्याचे पत्र मिळाले, तेव्हा त्यांनी संजय राऊत यांचे लिखाण ओळखले होते.

Sanjay Raut with Bal Thackeray

संजय राऊत यांनी ठाकरेंच्या तीन पिढ्यांसह कुख्यात गुंडांच्या दहशतीमध्येही काम केल्याचं म्हटलं जातं. आता अंडरवर्ल्ड राहिलेलं नाही. आता काहीच नाही. तेव्हाच्या काळातील मुंबईचं अंडरवर्ल्ड शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा गंभीर होतं. त्यावेळी गुंडाला भेटायला संपूर्ण मंत्रालय खाली यायचं. लोक मला एकेकाळी गुंड म्हणायचे. दाऊद इब्राहिमला मी पाहिलय, त्याच्याशी बोललोय, इतकेच नाही तर त्याला दमही दिलाय, असं संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

शिवसेना अनेकदा संजय राऊत यांच्यामुळे चर्चेत असते. अनेक मीडियाच्या कॅमेराची नजर संजय राऊत यांच्यावर असते, अनेकदा त्यांनी घेतलेली भूमिका ही शिवसेनेची भूमिका ठरलेली असते, त्यामुळे मातोश्रीवरूनही संजय राऊत यांना मोठं स्थान दिलं जातं, हे नक्की.

sanjay raut with uddhav thackeray
sanjay raut with uddhav thackeray

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments