बीएमसी

Dengue cases in Mumbai | मुंबईमध्ये डेंग्यू का वाढतोय; वर्ळी, भायखळा, दादर का बनताहेत हॉटस्पॉट?

सुरुवातीच्या काळात वरळी आणि धारावी, ही ठिकाणे कोरोनाची हॉटस्पॉट होते, ते आता डेंग्यूचे हॉटस्पॉट बनले आहेत.

Dengue cases in Mumbai | सुरुवातीच्या काळात वरळी आणि धारावी, ही ठिकाणे कोरोनाची हॉटस्पॉट होते, ते आता डेंग्यूचे हॉटस्पॉट बनले आहेत. भायखळा आणि दादरमध्येही तिच परिस्थिती आहे. गेल्या 12 दिवसात डेंग्यूचे 85 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी बहुतेकजण याच भागातील आहेत. वरळीमध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांना मारण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. असे असूनही येथे डासांची पैदास वेगाने होत आहे. (Why is dengue on the rise in Mumbai)

साधारणपणे, 2021 च्या सप्टेंबरपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते आहे, परंतु यावेळी डेंग्यूचा प्रादुर्भाव ऑगस्टपासूनच सुरू झाला. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 144 रुग्ण आढळले. त्यावेळी वांद्रे, सँडहर्स्ट रोड आणि परळ ही ठिकाणं हॉटस्पॉट होती. आता डेंग्यूचा परिणाम वरळी, भायखळा आणि दादरसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये दिसून येत आहे.

जी दक्षिण प्रभागातील कीटक नियंत्रण अधिकारी प्रशांत कांबळे यांनी या संदर्भात अदिकृत माहिती दिली आहे. जानेवारीपासून डेंग्यू डासांची निर्मिती होणारे 2,200 ठिकाणं नष्ट करण्यात आली आहेत, तर मलेरिया पसरवणाऱ्या डासांची 679 ठिकाणं नष्ट करण्यात आली आहेत. 1 जानेवारी ते 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत 3,606 मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. दररोज सरासरी 14 मलेरियाचे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती मुंबईच्या आरोग्य विभागाने दिली आहे. सप्टेंबरमध्ये मलेरियाचे 210 रुग्ण अवघ्या 12 दिवसात सापडल्याने अनेक ठिकाणी चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईमध्ये डेंग्यू का वाढतोय?

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना मुंबईमध्ये होत असतात. मात्र अनेक ठिकाणी हे पाणी साचून राहिलेलं असतं, सध्या मुंबईमध्ये बांधकाम क्षेत्रे जास्त सुरु आहेत, अशा ठिकाणी डासांची निर्मिती होण्याचा धोका सर्वाधिक असतो. मुंबईच्या अनेक ठिकाणांमध्ये मेट्रोची कामेही सुरु आहेत, तिथे साचलेलं पाणी आणि बांधकामामुळे स्वच्छतेकडे केले जाणारे दुर्लक्ष, या गोष्टींमुळे काही परिसरात डेंग्यूचे प्रमाण वाढत चालल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

वर्ळी, भायखळा, दादर का बनताहेत हॉटस्पॉट?

डेंग्यू सदृष्य रुग्णाच्या रक्तातील विषाणू ‘इडिस इजिप्‍ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसर्‍या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जाते. हे डास साधारणपणे समुद्रसपाटीपासून 1000 मीटर पर्यंतच्या भागात जिवंत राहतात. हा आजार साथी वेगाने पसरू शकतो. इडिस इजिप्‍ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे 5 मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. याच काळात वर्ळी, भायखळा, दादर सारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्यामुळे हा रोग पसरण्याचे प्रमाण जास्त आहे.

डेंग्यूची लक्षणे

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments