नॅशनल

Mumbai updates :अनेक दहशतवाद्यांच्या टार्गेटवर मुंबई का असते

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहेच, पण त्यासोबत संपूर्ण देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे.

Mumbai updates  :मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहेच, पण त्यासोबत संपूर्ण देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार 2018 पर्यंत, मुंबई हे दिल्लीनंतर देशातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे आणि सातव्या क्रमांकाचे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर माणले जाते.

2011 च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 12. 5 दशलक्षाच्या आसपास आहे. मुंबईतल्या सर्व सुविधा, व्यासायांचं केंद्र यांमुळे 2008 मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी असे नाव देण्यात आले. अनेक गोष्टींमुळे भारतातील सर्वाधिक करोडपती आणि अब्जाधीश हेदेखील मुंबई शहरातच राहतात. फक्त इतकच नाही, तर या सगळ्या गोष्टीबरोबरच अजून एका गोष्टीमुळे मुंबईचं नाव जगाच्या पातळीवर घेतलं जातं, ते म्हणजे इथले दहशतवादी हल्ले.

अनेक दहशतवादविरोधी तज्ज्ञांनी यावर अभ्यास केला आहे. मुंबईत होणारे दहशतवादी हल्ले नेमके का होतात, किंवा दहशथवाद्यांच्या मेन टार्गेटवर मुंबई का असते, याचा खुलासा अनेनकजणांनी करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. मुंबईत अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. इंग्रजांनी उभारलेल्या ऐतिहासिक इमारती, इथले पूल आणि सहाजिकच जगात प्रसिद्धी मिळवलेली मुंबईची लोकल. जागतिक दृष्ट्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून, प्रसिध्दी मिळवण्यासाठी अशा इमारतींवर हल्ला करणे, हे दहशतवाद्यांचे मुख्य कारण असते.

मुंबई शहर हे 1993 ते 2011 च्या दरम्यान 14 वेळा दहशतवादी हल्ल्यांना सामोरे गेले आहे. मुंबईत झालेला 26/11 चा हल्ला, त्यानंतर 13 जुलै 2011 रोजी घडलेला बाँबस्फोट हे त्यातील न विसरता येणारे आत्मघातकी हल्ले आहेत.

याचबरोबर मुंबईत झालेले आणखी काही दहशतवादी हल्ले :

1. 8 नोव्हेंबर 1991 रोजी झालेला कल्याण ट्रेन बाँबस्फोटमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 65 जण जखमी झाले होते.

2.12 मार्च 1993 रोजी मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात 257 लोक मृत्युमुखी पडले होते तर 700 पेक्षा अधिकजण जखमी झाले होते.

3. 2 डिसेंबर 2002 रोजी घाटकोपर येथे झालेल्या बस बॉम्बस्फोटमध्ये दोघेजण टार झाले होते तर 14 जण जखमी झाले होते.

4. 27 जानेवारी 2003 रोजी विलेपार्ले येथे झालेला दहशतवादी हल्ल्यात 1 ठार, 28 जण जखमी झाले होते.

5. 13 मार्च 2003 रोजी झालेला मुलुंड बाँबस्फोट प्रकरणात 10 जण मृत्युमुखी पडले होते तर 70 जण जखमी झाले होते.

6. 28 जुलै 2003 रोजी लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 मृत्यु तर 32 जण जखमी झाले होते.

7. 25 ऑगस्ट रोजी गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेला कार हल्ल्यात 54 जण ठार झाले होते तर 244 जण जखमी झाले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments