भुक्कड

Zomato : झोमॅटो शेअर्समध्ये का होते घसरण, गौरव गुप्तांनी का दिला राजीनामा…

कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल व कंपनीचे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.

Zomato : झोमॅटो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय रेस्टॉरंट एग्रीगेटर आणि फूड डिलीव्हरी कंपनी आहे. जी दीपेंद्र गोयल, पंकज चड्डा आणि गुंजन पाटीदार यांनी 2008 मध्ये स्थापन केली होती. झोमॅटो आणि स्विगी या दोनच मोठ्या फूड डिलिव्हरी एग्रीगेटर कंपन्या भारतात जवळपास सर्व बाजारहिस्सा राखून आहेत. झोमॅटो भारतातील 525 पेक्षा जास्त शहरांमध्ये व 23 देशांमध्ये सेवा पुरवते. झोमॅटो ॲप व वेबसाईट मिळून 4.1 कोटी मासिकचे सक्रिय वापरकर्ते आहेत. Why is there a fall in Zomato shares, why did Gaurav Gupta resign …

झोमॅटोवर ऑर्डर कशी करावी?
सर्वप्रथम, झोमॅटो ॲप ओपन करा.नंतर ज्या रेस्टॉरंटमधून तुम्हाला तुमचे अन्न ऑर्डर करायचे आहे ते शोधा. रेस्टॉरंटचे पान ओपन झाल्यावर  उजव्या बाजूने “ऑर्डर डिलिव्हरी” वर क्लीक करा. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक डिशच्या किंमतींसह संपूर्ण मेनू मिळेल. आपल्याला हवी असलेली डिश जोडा व ती कार्टमध्ये पुनर्निर्देशित केली जाईल. एकदा आपण सर्व पसंतीचे खाद्यपदार्थ जोडले की, स्क्रीनच्या तळाशी कार्ट पहाण्यासाठी जा,तिथे तुम्हाला एकूण किंमत दिसेल. यानंतर ज्या पत्त्यावर तुम्हाला तुमचे अन्न मागवायचे आहे तो पत्ता निवडा.तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शनद्वारे किंवा क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा ऑनलाइन पेमेंट पद्धतींसारख्या अनेक पेमेंट पर्यायांद्वारे पेमेंट पूर्ण करू शकता.ही सर्व प्रोसेस तुम्ही ऑनलाइन करू शकता.

होम डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो या कंपनीचे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 2015 मध्ये झोमॅटोत सामील झालेल्या गुप्ता यांच्याकडे 2018 मध्ये कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपला IPO बाजारात आणला होता. या  IPO मागे गुप्ता हे मुख्य चेहरा होता. तसेच ते गुंतवणूकदार व माध्यमांसोबत प्राधान्याने चर्चेत सामीलही झाले होते.

गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल व कंपनीचे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. तसेच गौरव गुप्ता यांनी सुरू केलेले सर्व व्यवसाय जवळपास बंद झाले आहेत. यामागे गौरव गुप्ता हे व्यवसायत चांगली कामगिरी करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नुकताच झोमॅटोने ग्रॉसली डिलिव्हरी सेवा आणि न्युट्रास्युटिकल व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतरच काही दिवसांत गुप्ता यांच्या राजीनाम्याची बातमी  समोर आली आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments