आपलं शहरबीएमसी

Action from bmc : मास्क न लावणाऱ्यांकडून BMC ने उकळले 77,37,41,000 रुपये; पाहा संपूर्ण आकडेवारी

मार्च 2020 पासून मास्क न वापरणाऱ्यांकडून एकूण 77,37,41,000 रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे.

Action from bmc :कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, सरकारने त्या संबंधित निर्बंध जारी केले होते, त्यापैकी एक म्हणजे मास्क हा सर्वांसाठी सक्तीचा करण्यात आला होता. परंतु  मास्क न लावल्याने अनेक जणांना कडून दंड वसूल करण्यात आला आहे.(BMC boiled Rs 77,37,41,000 from those who did not wear masks;  See full statistics)

तर एका अहवालानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेल्या वर्षीपासून ते आतापर्यंत कोरोना व्हायरस  प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण 77.37 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.  मार्च 2020 पासून मास्क न वापरणाऱ्यांकडून एकूण 77,37,41,000 रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे.

अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, BMC ने गेल्या दीड वर्षांत एकूण 227  वॉर्डांमधून 64.16 कोटी रुपये जमा केले आहेत. तर  मुंबई पोलिसांनी याच कालावधीत 12.70 कोटी रुपये जमा केले आहेत. तसेच, मुंबई विभागातील रेल्वेने आतापर्यंत 50.35 लाख रुपये जमा केले आहेत.

दरम्यान, रविवारी, 24 ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 75 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होती,तर  मृत्यूची संख्या 20 पेक्षा कमी होती, जी 34 आठवड्यांतील सर्वात कमी असल्याचे म्हटले आहे.  याशिवाय राज्यातील कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा 1,40,016 वर पोहोचला आहे. अशाप्रकारे BMC ने गेल्या वर्षीपासून ते आतापर्यंत मास्क न लावलेल्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments