आपलं शहरफेमस

Axa Beach : मुंबईतील शांत व सौंदर्याने नटलेला अक्सा बीच;पहा का आहे खास…

अक्सा बीच हा एक नीटनेटका , सुंदर व वालुकामय समुद्रकिनारा आहे.

Axa Beach : तुम्ही मुंबईतील अनेक समुद्रकिनाऱ्यांना भेट दिली असेल व समुद्राची सौंदर्याने नटलेली अनेक दृश्य टिपली असतील. परंतु असाच एक मुंबईतील समुद्रकिनारा आहे. मुंबई शहरापासून थोडा लांब एक शांत स्थान असलेला अक्सा बीच . अक्सा बीच हा एक नीटनेटका , सुंदर व वालुकामय समुद्रकिनारा आहे. तुमच्या आयुष्यातील एक दिवस शांतपणे घालवण्यासाठी या बीचला तुम्ही एकदा तरी नक्की भेट दिली पाहिजे.(Axa Beach in Mumbai is full of serenity and beauty; see why it is special …)

तुम्ही या बीचवर लाटांचे संगीत ऐकू शकता. अक्सा बीचवर तुम्ही एकटाने किंवा आपल्या फॅमिली बरोबर वेळ घालवू शकता. समुद्रकिनाऱ्यावर चालणे,अक्सा बीचवर तुम्ही सनबाथ घेऊ शकता. परंतु अक्सा बीचवर पोहण्यास मनाई आहे. येथील आकर्षक दृश्य पहाण्यासाठी पर्यटक येथे वारंवार भेट देत असतात.

समुद्रकिनाऱ्यावर अनेक भोजनालये नाहीत परंतु स्थानिक विक्रेत्यांनी विकलेले हलके स्नॅक्स येथे तुम्ही खाऊ शकता. समुद्रकिनाऱ्याबद्दल सर्वात चांगले म्हणजे ते शहराच्या धावपळीपासून दूर आहे. त्याने त्याचे नैसर्गिक आकर्षण अबाधित ठेवले आहे. या व्यतिरिक्त, सुंदर चित्रे टिपण्यासाठी हे एक आश्चर्यकारक ठिकाण आहे.

समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक व्हिला, हॉटेल्स, कॉटेज देखील आहेत, जिथे तुम्ही राहू शकता. तुम्ही अक्सा बीज जवळील अनेक आकर्षक स्थळे पाहू शकता,जसे की मोर्वे बीच, कान्हेरी लेणी, मुंबा देवी मंदिर इत्यादी. हा समुद्रकिनारा आश्चर्यकारकपणे ज्वलंत स्कायलाईन दृश्यासाठी प्रसिद्ध आहे व अक्सा बीच हा या प्रदेशातील सर्वात लांब समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे.

मुंबईतील हा शांत व अद्भुत समुद्रकिनारा अक्सा गाव, मालाड पश्चिम, मुंबई येथे स्थित आहे. अक्सा बीच पर्यटकांसाठी 24 तास उपलब्ध आहे. दृश्यांचा आनंद घेण्यासाठी किंवा किनाऱ्यावर फिरण्यासाठी येथे कोणत्याच प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments