खूप काहीफेमस

Bandra-Worli Sealink : वांद्रे-वरळी सीलिंक मुंबईतील प्रसिद्ध पूल;का आहे एवढा आकर्षक…

मुंबईची शान वाढवणाऱ्या या पुलावर तुम्ही कधी प्रवास केला आहे का?

Bandra-Worli Sealink :मुंबईत आपण अनेक मोठे हायवे,रस्ते पाहिले असतील,परंतु मुंबईला सुपरफास्ट करणारा व वांद्रेहून दक्षिण मुंबईला जोडणारा सागरी पूल म्हणजे मुंबईतील  वांद्रे-वरळी सीलिंक.  महाराष्ट्र शासनाचा हा एक ड्रिम प्रोजेक्ट होता. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पुल हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. 1600  कोटी रुपये खर्च करून दहा वर्षांच्या बांधकामानंतर 30 जून 2009 मध्ये हा पूल सुरू करण्यात आला. मुंबईची शान वाढवणाऱ्या या पुलावर तुम्ही कधी प्रवास केला आहे का? या पुलाचे अनेक वैशिष्ट्य आहेत.(Bandra-Worli Sealink is a famous bridge in Mumbai; why is it so attractive …)

20211020 200632

रात्रीच्या वेळी पुलाचे दृश्य व सौंदर्य पाहण्यासारखे आहे कारण मुक्काम केबल्स पूर्णपणे रात्रीच्या वेळी प्रज्वलित केले जातात. त्यात पुलावर चालणारी वाहने ही आणखी सुंदर दिसतात. ही सर्व दृश्य डोळे टिपून टाकतात. हा आश्चर्यचकित करणारा नजारा मनाला प्रसन्न करणारा आहे.

मुंबईचा वांद्रे वरळी सीलिंक, या पुलाला ‘राजीव गांधी सीलिंक’ असे नाव देण्यात आले होते, परंतु या पुलाची ओळख वांद्रे-वरळी सीलिंक अशीच आहे.  भारतातील खुल्या समुद्रांवर बांधलेला हा पहिला केबल-स्टे ब्रिज आहे. वांद्रे-वरळी सीलिंक मुंबईच्या प्रमुख स्थळांपैकी एक आहे. आर्किटेक्चर व आधुनिक पायाभूत संरचनांच्या श्रेणी अंतर्गत 2018 च्या टॉप 10 ट्रिप अँडव्हायझर्स ट्रॅव्हलर चॉईस अवॉर्ड्समध्ये देखील या पुलाने स्थान मिळवले आहे.

वांद्रे-वरळी सीलिंक मुंबईचा इतिहास

20211020 200712

वांद्रे-वरळी सीलिंकला एकूण 8 लेन आहेत.  या सीलिंकच्या 8 लेनपैकी सुरुवातीचे 4 लेन हे 30 जून 2009 मध्ये सुरू केले गेले. व संपूर्ण पूल 24 मार्च 2010  साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. पूर्वी वांद्रेमधून वरळीत येण्यासाठी जवळपास 60 ते 90 मिनिटे लागत होती. मात्र या सीलिंकमुळे अवघ्या 20 ते 30 मिनिटात हा प्रवास आता करता येतो.

हा सीलिंक कुतुब मिनारच्या 63 पट उंच आहे. तसेच हा पूल 126 मीटर उंच असून 66 फुटांचा आहे.  इकडे असलेले पायलॉन टॉवरही उंच असून सर्वात उंच टॉवर 128 मीटरचा आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 1999 मध्ये या लिंकच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळेस हे काम अवघ्या 5 वर्षात होईल असे सांगण्यात आले होते. मात्र स्थानिकांनी या प्रोजेक्टला विरोध केल्यामुळे हे काम रखडले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या लिंकला  मान्यता दिल्यानंतर 10 वर्षांनी या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे संपूर्ण बांधकाम केवळ भारतातील निपुण कारागिरांनीच पूर्ण केले आहे,असे नाही.तर जगभरातील 11 देशातील आर्किट्रेक्चर संस्थानी या सीलिंकच्या कामाला हातभार लावला आहे. या सीलिंकवर दुचाकी व तीनचाकी वाहनांना प्रवेश नाही.

वांद्रे-वरळी सीलिंक पश्चिम उपनगर-दक्षिण मुंबई येथे आहे. या सीलिंकवर प्रवास करण्यासाठी टोल आकारला जातो.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments