खूप काही

BDD Chaal Project : BDD चाळीच्या पुनर्विकास प्रकल्प होणार लवकरच सुरू, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.

BDD Chaal Project : BDD चाळीच्या प्रकल्पासंबंधी सर्व मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी सह्याद्री अतिथीगृहातील बीडीडी चाळीच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. (BDD Chali redevelopment project to start soon, CM orders)

या बैठकीत बीडीडी चाळ प्रकल्पातील कर्मचारी अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबरोबरच पोलीस सेवा निवासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची तरतूद, बीडीडी चाळमध्ये ई-नोंदणी सुविधा इत्यादी मुद्द्यांवर ही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला अनेक मंत्री उपस्थित होते

BDD चाळ या प्रकल्पाच्या बैठकीत राज्याचे अनेक मंत्री उपस्थित होते.  गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सोनिक, अपर मुख्य सचिव महसूल नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृहनिर्माण प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष व सीईओ अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments