
Central Railway : लोकडाऊनमुळे मध्य रेल्वेवर (सेंट्रल रेलवे) ट्रान्स हार्बर मार्गावर एसी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या,परंतु त्या सेवा आता मध्य रेल्वेने 7 ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारपासून मुंबईच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व 16 एसी लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.(AC local to run on Trans Harbor from Thursday; see what is the management of Central Railway …)
कोरोना व्हायरस महामारीमुळे व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे रेल्वेने गेल्या वर्षी एसी लोकल ट्रेन सेवा व इतर उपनगरी सेवा बंद केल्या होत्या. लॉकडाऊन उठल्यानंतर नियमित उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली होती. पण एसी गाड्या चालवण्यात येत नव्हत्या.
त्यामुळे मध्य रेल्वे आपल्या उपनगरीय नेटवर्कवरील ट्रेन सेवा 7 ऑक्टोबरपासून पूर्व-साथीच्या दरापेक्षा 96 टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.मध्य रेल्वेने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, ट्रान्स हार्बर मार्गावरील पहिली एसी लोकल पनवेल ते ठाणे 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.44 वाजता सुटेल, तर शेवटची ट्रेन पनवेलहून रात्री 10.46 वाजता सुटणार आहे.
एसी कोचसह 16 सेवा सोमवार ते शुक्रवार दरम्यान चालवण्यात येतील.परंतु शनिवारी या गाड्या एसी कोचशिवाय चालवल्या जातील. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या सेवा चालणार नाहीत.असे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
हे ही वाचा :