लोकल

Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, मुंबई-पुणे दरम्यान विशेष ट्रेन…

सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेने मुंबई आणि पुणे दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Central Railway : सध्या मुंबई व संपूर्ण देशात एकापाठोपाठ एक सण येत आहेत. अशात मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एक सोयीस्कर बातमी दिली आहे. सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेने मुंबई आणि पुणे दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.(Good news for passengers from Central Railway, special train between Mumbai-Pune …)

विशेष ट्रेन पुढील तपशीलांनुसार धावतील

मध्य रेल्वे 01009 विशेष ट्रेन 18 ऑक्टोबर, 2021 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 5.50 वाजता रेल्वेच्या पुढील आदेशापर्यंत सुटेल आणि त्याच दिवशी 9.50 वाजता ती विशेष ट्रेन पुण्याला पोहोचेल. तर 01010 विशेष ट्रेन 18 ऑक्टोबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत दररोज 06.05 वाजता पुण्याहून सुटेल आणि त्याच दिवशी 09.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

मुंबई ते पुणे दरम्यान ही विशेष ट्रेन दादर, ठाणे (फक्त 01009 साठी), कल्याण, कर्जत, लोणावळा, चिंचवड, पिंपरी, खडकी आणि शिवाजी नगर इत्यादी स्थानकांवर थांबणार आहे.

कोरोना व्हायरसशी संबंधित एसओपी, बोर्डिंग, प्रवास व गंतव्यस्थानावरील सर्व नियमांचे पालन करून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार आहे. मुंबईत शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यासाठी मध्य रेल्वेने 5 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.

अलीकडेच, सीआरच्या महाव्यवस्थापकांनी संयुक्त समितीची बैठक घेऊन असामान्य घटनांमुळे मृत्यू व इजा कमी करण्याच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आहे. संयुक्त समितीच्या सदस्यांमध्ये अभियांत्रिकी, सुरक्षा, सिग्नल , दूरसंचार विभाग, रेल्वेचे सुरक्षा विभाग व महाराष्ट्र सरकारचे परिवहन आयुक्त इत्यादी प्रमुखांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments